सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माणुसकी समुहाचे मुंडन आंदोलन
मुख्यमंत्री साहेब शहरात बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्णांचे काय ? ….समाजसेवक सुमित पंडित

संभाजीनगर प्रतीनिधी / प्रादेशिक मनोरुग्णालयाची उभारणी जालना ऐवजी संभाजीनगर येथे करा या मागणीसाठी,सोमवार दिनांक २-१०-२३ रोजी सकाळी ११:३० मी विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे अनोख्या पध्दतीने मुंडन अदोलंन माणुसकी समुह व समाजसेवक सुमित पंडित यांच्या तर्फे करण्यात येणार आहे,मराठवाड्यातील संभाजीनगर येथे खाटांची मर्यादा वाढवून रुग्णालय निर्मितीचा निर्णय घ्यावा, मराठवाडा विभागात आजपावेतो एकही शासकीय मनोरुग्णालय अस्तित्वात नव्हते,यापूर्वीच्या आघाडी सरकारने ३/८/२०२१ रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय जालना येथे स्थापन करण्यास शासन निर्णय क्रमांक २०२१/प्र.क. ७४/आरोग्य -३ अ. दिं ०५ आॕक्टोबर,२०२१ चे शासनाचे पत्र,निर्णय द्वारे मान्यता देण्यात आलेली आहे परंतू संभाजीनगर हे मराठवाड्याचे मुख्यालय आहे,संभाजीनगर शहराचे भौगोलिक तथा लोकसंख्येचे महत्व लक्षात घेता मराठवाडा खांन्देश,विदर्भातील काही जिल्हे यांच्यासाठी सोईचे आहे.सांभाजीनगर,हे शहर या प्रशासकीय मुख्यालयाचे केंद्र असून इथे विभागिय कारागृह आहे.या कारागृहात हजारो कैदी आहेत त्या कैद्यांच्या मनोस्वास्त्याचा प्रश्न वेळोवेळी निर्माण होतात तसेच मुंबई उच्य न्यायालयाचे खंडपीठ संभाजीनगर शहरात आहे.जे मनोरुग्ण झालेल्या आरोपी अथवा गुन्हेगारांची न्यायालयास गरज भासल्यास त्यांना सहज मनोरुग्णालयात हजर करणे सोईचे आहे.तसेच इतर शासकीय वैद्यकीय सेवासुविधांची गरज मनोरुग्णांना पडल्यास घाटी सारखी कनेक्टीव्हीटी मिळणे जालन्या पेक्षा केंव्हाही सोपे आहे. या आधी माणुसकी समुहाणे मुख्यमंत्र्यांना दिले होते निवेदन उत्तर न मिळाल्यामुळे हे आंदोलन.. करावे लागत आहे असे माणुसकी समुहातर्फे मुक्ताराम पाटील गव्हाणे, व समाजसेवक सुमित पंडीत यांनी सांगितले.शहरातील ज्या व्यक्तींना मनोरुग्णालय शहरात व्हावेसे वाटते त्यांनी नक्कीच या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान माणुसकी टिम तर्फे करण्यात आले आहे.