आर्यन फाउंडेशनचा
संगीतसूर्य केशवराव भोसले व स्मिता पाटील पुरस्कार शंभू पाटील व हर्षल पाटील यांना प्रदान होणार

आर्यन फाउंडेशनचा
संगीतसूर्य केशवराव भोसले व स्मिता पाटील पुरस्कार शंभू पाटील व हर्षल पाटील यांना प्रदान होणार
आर्यन फाउंडेशन यांच्या वतीने अनेक वर्षापासून कोजागिरीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आर्यन फाउंडेशनच्या अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणात हा सांस्कृतिक कार्यक्रम कोजागिरीच्या दिवशी रसिकांसाठी दुग्धशर्करा योग असतो. या वर्षापासून आर्यन फाउंडेशनच्यावतीने राज्यभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, सेवा , कृषी, साहित्य अशा विविध विषयातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, अच्युत गोडबोले, डॉ. आनंद नाडकर्णी, विजय बाविस्कर आणि अलका मांडके यांच्या निवड समितीने निवड केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहेत . यावर्षी सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये गाणसूर्य केशवराव भोसले पुरस्कार परिवर्तनचे शंभू पाटील यांना जाहीर झालेला आहे तर स्मिता पाटील पुरस्कार परिवर्तनच्या हर्षल पाटील यांना देण्यात येणार आहे . आज पुष्कर श्रोत्री यांच्या दिलं की बात या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शंभु पाटील यांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार , 31 हजार रुपये रोख , मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे.
तर हर्षल पाटील यांना स्मिता पाटील पुरस्कार 21 हजार , मानपत्र असा असणार आहे . हा पुरस्कार परिवर्तनच्या माध्यमातून राज्यभर जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राला ओळख निर्माण करून देत जळगावची रंगभूमी व एकूणच खानदेशच्या सांस्कृतिक विश्वाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर आणण्याचे काम शंभू पाटील व हर्शल पाटील यांनी केलेले आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे, म्हणूनच आम्ही हे पुरस्कार आर्यन फाउंडेशनच्या वतीने सुरू केले आहेत. यासाठी आम्हाला निवड समितीतील मान्यवरांचे सहकार्य लाभलेलं आहे. अशी भावना आर्यन फाउंडेशनचे डॉ. रवी महाजन व डॉ. रेखा महाजन यांनी व्यक्त केली.