
संविधान बचाव यात्रा जळगावात आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार.
भारतीय संविधान ही देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वत्रिक ओळख असून या संविधानाचा प्रचार आणि प्रसार लक्षात घेता संविधानावर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने घाला घालण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होत आहे अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि लोकांमध्ये संविधान जागृती निर्माण करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिनांक 24 ऑक्टोबर पासून दीक्षाभूमी नागपूर येथून सुरू झालेली संविधान बचाव यात्रा दिनांक पाच नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव दाखल होत आहे यावेळी शिवतीर्थ मैदान येथून भव्य मिरवणूक निघून त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रेल्वे स्टेशन परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट राजेश झाल्टे हे उपस्थित राहणार असून या संविधानाचा आदर करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान हे केवळ लोकशाही अधिकार कर्तव्य अंतर्भूत असलेले पुस्तक नसून तात्विक दृष्ट्या इथल्या शेवटच्या घटकाची सर्वांगीण काळजी वाहणारा तत्व ग्रंथ आहे देशाला समृद्धतेच्यां उंच शिखरावर नेणाऱ्या त्याच संविधानाला आज बदलण्याची भाषा केली जात आहे हा धोका ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब आणि त्यांच्या नेतृत्वात काकासाहेब खंबाळकर व संविधान अभ्यासक यांच्या सहभागाने ही संविधान बचाव यात्रा जळगाव येथे येत असून या यात्रेत आणि सभेला महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. करीम सालार सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल व मान्यवर उपस्थित राहणार असून दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या रॅलीस व संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेल्या सभेत उपस्थितीचे आवाहन संविधान बचाव यात्रेचे संयोजक तसेच सहभागी असणारे कार्यकर्ते यांनी केले आहे.