

डोंबिवली येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा संपन्न.. आंतरशालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी १३०० खेळाडूंच्या विक्रमी समावेश.
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी ) क्रिडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा 2023 24 चे डोंबिवली येथील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, यांचा मार्गदर्शनाखाली, उत्कृष्ट क्रीडा संघटक कृष्णा बनगर, मॉडेल स्कूल चे पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक अशोक जगताप,नेरुळकर ज्यू. कॉलेज चे अनंत उतेकर, आणि चंद्रकांत पाटकर विद्यालयाचे विवेक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली १४,१७,१९ वर्षाखालील मुलांचा जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेसाठी नेरुलकर स्कूल अँड ज्यू.कॉलेज चे प्राचार्य अरुण गवई यांनी खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत जवळपास १५०० कॅरम पटू खेळाडूंनी सहभाग नोंदवला.यामधे १९ वर्षाखालील गटात बी.के बिर्ला कॉलेज चा नितेश चव्हाण याने प्रथम क्रमांक व साई गणेश याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच प्रगती कॉलेज चा जय कासार, मॉडेल कॉलेज चा आदित्य पांडे,बिर्ला कॉलेज चां रोहित भोसले आणि साकेत कॉलेज चा दुर्गेश यादव यांनी देखील विशेष प्रावीण्य मिळवले.यावेळी डी.के व्हि.सी स्कूल चे क्रीडा शिक्षक लवलेश मिश्रा, रेल्वे स्कूल चे आर. बी.नितनवरे, होली एंजल स्कूलचे क्रीडा शिक्षक राजू घुले, विद्या मंदिर मांडा टिटवाळा चे दिलिपसिंग साळुंखे, ओमकार स्कूलच्या स्पोर्ट्स टीचर प्रतिभा जाधव, गार्डियन स्कूल चे कोच मंदार कुलकर्णी, साई इंग्लिश स्कूल चे क्रीडा शिक्षक शशी पाटील, लोक कल्याण स्कूल चे संजय वाघ, पाटील बालमंदिरचे रविंद्र पाटील, सिद्धार्थ विद्यालयाचे क्रीडा संघटक प्रविण खाडे, जन गण मन स्कूलचा क्रीडा शिक्षिका वैशाली शिंदे, सेंट लॉरेन्स इंग्लिश स्कूल चा शलाका दातार,अभिनव विद्यालय डोंबिवली चा सोनाली पवार,न्यू.इरा स्कूल डोंबिवली चे मुकेश शेलार,आदर्श इंग्लिश स्कूल चे सुनिल भांगरे, यांच्यासह सर्व क्रीडा संघटक,क्रीडा शिक्षक,क्रीडा असोसिएशन यांच्याकडून विशेष परिश्रम घेतले.उद्या याच ठिकाणी मुलींचा कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहेत.