अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन






अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते अगोदर कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ ,महिला शहरअध्यक्षा नयना पाटील, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, मा.जी. प सदस्य के.डी बापू पाटील ,मुन्नाभाऊ शर्मा यांनी करून प्रतिमेला माल्यार्पण केले.
कार्यक्रमात मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या कार्याला उजाळा दिला.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान: स्वतंत्र भारताच्या इतिहासात इंदिरा गांधी या एकमेव महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. त्यानंतर आजपर्यंत एकाही महिलेला या पदावर संधी मिळालेली नाही
पहिली आण्विक चाचणी घेतली : आयर्न लेडी अशी ओळख मिळालेल्या इंदिरा गांधी या दूरदर्शी होत्या. भारताला जागतिक अणुशक्ती बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या त्या पहिल्या नेत्या होत्या. शेवटी पोखरणमध्ये ‘स्माइलिंग बुद्धा’ अशी ओळख मिळालेली यशस्वी अणुचाचणी त्यांच्या कारकीर्दीत घेण्यात आली असे सांगितले..
यावेळी वेळी काग्रेंस पक्षाचे पदाधिकारी अर्बन बँकेचे संचालक
प्रवीण जैन, टि.डी एफ संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, मा.तालुका अध्यक्ष बी.के सूर्यवंशी , राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष बन्सिलाल भागवत गुरुजी, गजेंद्र साळुंखे, प्रताप पाटील, बोरसे साहेब, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष तौसीफ तेली,सईद तेली,राजू भाट, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज बापू पाटील,आसिफ बागवान, राजू शेख, गोविंदा पाटील, किशोर पाटील, मा.सभापती धनगर आण्णा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. सुभाष पाटील, प्रा विश्वनाथ ठाकरे, प्रा संजय पाटील सह, ठाकरे सर,पत्रकार ईश्वर महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष भागवत गुरुजी यांनी केले तर आभार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी मानले.. यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात मुन्नाभाऊ शर्मा ,संदीप घोरपडे सह विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.