• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

रक्तदान हे एक जगातील सर्वश्रेष्ठ दान
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मान्यवरांच्या  हस्ते झाला सन्मान…

Nov 23, 2023

Loading

रक्तदान हे एक जगातील सर्वश्रेष्ठ दान

उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे प्रतिपादन

रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सन्मान…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

आजचे युग हे धावपळीचे असल्याने आपण आपल्या कामासाठी सतत धावपळ करीत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत आपली दगदग सुरूच असते. असे धावपळीचे जीवन जगत असतांना मात्र आपले आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. यातूनच आपल्या शरीरात आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. वेळेवर त्यांची काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम जीवावर बेतू शकतो.
“आरोग्य हीच खरी धनसंपत्ती” असून रक्तदान हेच जीवनदान आहे.असे अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी अमळनेर तालुक्यातील रक्तदान चळवळीचे सदासर्वे मनोज शिंगाणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदात्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की रक्त हा आपल्या शरीरातील एक आवश्यक घटक आहे, जो शरीराला सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करतो. रक्तदान म्हणजे गरजू लोकांना निरोगी रक्तदान करणे. जास्त प्रमाणात रक्त कमी झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे रक्तदान म्हणजे जीव वाचवण्याचे कार्य आहे या चळवळीत अमळनेर तालुक्यातील युवकांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले.
तालुक्यात सर्वाधिक रुग्णांना सदैव रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा ट्रॉफी देऊन प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेळोवेळी अमळनेर युवा मित्र परिवार ग्रुप तर्फे फक्त एका मॅसेज वर अनेक युवक गंभीर रुग्णांना तातडीने रक्त देण्यासाठी तयार असतात.अमळनेर शहरात सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांच्या मार्फत रक्तदान चळवळ चालवण्यात येते. गंभीर रुग्णांना युवक एकत्र आल्याने आता प्रत्येक रक्तगटाचे रक्त कोणत्याही क्षणी उपलब्ध होत असते त्यामुळे रुग्णाचा पैसा आणि वेळ तसेच जीवही वाचतो काही युवकांनी यासाठी वेळोवेळी रक्तदान केले आहे. मनोज शिंगाणे यांचे रक्तदान चळवळ ही फक्त अमळनेर तालुक्यापूर्ती मर्यादित नसून ती कोणताही जिल्हा असो ते रुग्णांना रक्त लागल्यावर मनोज शिंगाणे यांना संपर्क करतात.त्यांची रक्तदान चळवळ संपूर्ण खानदेशात चालू आहे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत,डॉ सुनील शिंगाणे आणि सुहास ग्रुप बसस्टँड यांनी या महान रक्तदात्यांचा सत्कार सोहळा पाठक प्लाझा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते रक्तदात्याचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते, संचालक प्रवीण जैन , संचालिका वसुंधरा लांडगे, संचालक व आरोग्यदूत प्रवीण पाटील, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जयंतलाल वानखेडे, अमळनेर शहर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,पत्रकार
ईश्वर महाजन,उमेश धनराळे,राहुल बहिरम प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.सूत्रसंचालन रणजित शिंदे तर आभार संजय पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *