





संविधानाचे संरक्षण करणे गरजेचे..
प्रा.प्रकाश पाटील
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संविधान दिन उत्साहात साजरा…
अमळनेर प्रतिनिधी
देशाचा विकास आणि प्रगतीचा मार्ग हा संविधानातील मूल्यांवर आधारित आहे. संविधान हा आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. याची जाणीव सर्वांना हवी; पण ती तितकीशी झाली नाही. त्यासाठी संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर जितका खल आतापर्यंत झाला आहे, तितका खचितच घटनेतील एखाद्याा कलमावर झाला असेल. स्वातंत्र्याचा हक्क हा सर्व हक्कांचा आत्मा आहे.
असे अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात संविधान दिनानिमित्ताने प्रा.प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले..
ते पुढे म्हणाले की घटनेच्या कलम 19 ते 22 या कलमांमध्ये या हक्काचा विचार करण्यात आला आहे. कलम 19 नुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य दिलं आहे. तसंच भारताच्या कोणत्याही भागात संचार करण्याचं स्वातंत्र्य, कोणत्याही भागात वास्तव्याचं स्वातंत्र्य, तसंच कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे.
2014 पासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे असं एका विशिष्ट गटाला वाटतं. 2016 मध्ये जेएनयूमध्ये जे आंदोलन झालं. त्यात ‘आझादी’ हा शब्द केंद्रस्थानी होता. मोदी सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आल्यात, देशात आणीबाणीसारखीच परिस्थिती आहे, सरकारचं प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आहे, ही टीका होत असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचं बंधन घालण्याचे प्रकार वारंवार होत असतात. 2009 मध्ये सरकारने एक कायदा आणून इंटरनेटवर विशेषत: सोशल मीडियावर वाट्टेल ती मतं प्रदर्शित करण्यावर बंधनं आणली होती. 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्दबातल ठरवला. संविधानाचे संरक्षण करणे काळाची गरज आहे असे सांगितले.
अगोदर भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.प्रकाश पाटील यांनी केले तर सानेगुरुजी वाचनालयाचे संचालक बी.एस.जाधव यांनी प्रतिमेला माल्यार्पण केले.
यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मार्गदर्शन करणारे व सेट परीक्षा इंग्रजी विषयातून उत्तीर्ण होणारे प्रा.प्रकाश पाटील यांचा सत्कार वाचनालयाचे जेष्ट संचालक बी.एस.जाधव,ईश्वर महाजन,स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार यांनी सन्मानपत्र देऊन केला.
यावेळी मुंबई मेट्रोत निवड झालेल्या विशाल सोनवणे यांचाही सत्कार करण्यात आला व त्याच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.
संविधान दिनानिमित्ताने साने गुरुजी वाचनालयाची कर्मचारी व विशाल सोनवणे, मयूर पाटील ,नितीन सोनवणे, सह अनेक स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.