• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

या जगात शिंपी समाज नसता तर जगाचं काय झालं असतं :: केंद्रिय मंत्री कपिल पाटील

Nov 28, 2023

Loading

या जगात शिंपी समाज नसता तर जगाचं काय झालं असतं :: केंद्रिय मंत्री कपिल पाटील
शिंपी समाज उन्नती मंडळाच्या वतीने कल्याण येथे संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्साहात संपन्न.
ठाणे, ( प्रतिनिधी): कल्याण श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजोन्नति मंडळाचा वतीने, कल्याण शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री नामदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, कल्याण शिंपी समाज केंद्रीय मंत्री कपिल पाटील, कल्याण शहर आमदार विश्वनाथ भोईर, कोकण विभाग पदवीधर आमदार निरंजन डावखरे, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेंद्रजी पवार, समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ.सोन्या भाऊ पाटील,श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेशभाऊ खैरनार, नगरसेवक संजय पाटील, , दैनिक स्वराज्य तोरण संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे, बीजेपी व्यापारी आघाडी अध्यक्ष डॉ.यशवंत सोरे, उद्योजक समाजसेवक डॉ.रामचंद्र देसले, स्वामीनारायण ट्रस्ट डॉ.दिनेश भाई ठक्कर, राष्ट्रीय युवा अध्यक्ष रुपेश बागुल, मध्यवर्ती संस्थेचे विश्वस्त विजय नाना बिरारी,या प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती सोहळा मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख मनिलाल शिंपी, व कल्याण शिंपी समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद शिंपी यांचा संकल्पनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पालखी सोहळा
सकाळी . संत श्री गजानन महाराज मंदिर भोईरवाडी येथून श्री संत नामदेव महाराजांची पालखी निघून इच्छामनी महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा संगिता पस्टे, व स्वरांगी भजनी मंडळाचा बबिता मॅडम यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात श्री वामनराव पै सभागृहापर्यंत पारंपारिक पद्धतीने समाज बंधू भगिनींनी सहभाग घेत मिरवणूक काढली. व संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला.उपस्थित मान्यवरांचा हस्ते कल्याण मधील डॉक्टर, वकील व शिवणकाम काम व्यवसाय करणाऱ्या समाजबांधवांच्या ” समाजगौरव: २०२३:२४,पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मध्यवर्ती संस्थेचे कार्यक्रमासाठी मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेशभाऊ खैरनार,यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी समाजबांधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपाध्यक्ष डॉ. सुनील भांडारकर, राष्ट्रीय युवा अध्यक्ष रुपेशभाऊ बागुल, विश्वस्त विजय नाना बिरारी, संचालक विजय खैरनार, महाराष्ट्र राज्य उपसंघटक कृष्णाजी मांडगे, कला व सांस्कृतिक विभाग उपप्रमुख रवींद्र नेरपगार, मुंबई विभाग समाज संघटक डॉ. प्रसाद जगताप, रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शिंपी, युवक सह सचिव योगेश निकुंभ,ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष रेखा मांडगे, मुंबई जिल्हा महिला अध्यक्ष चेतना गवांदे, मुंबई जिल्हा सचिव गवांदे माजी उपाध्यक्ष किशोर शिंपी, माजी सचिव रामेश्वर धाडणकर, एरंडोल तालुका अध्यक्ष कांतीलाल शिंपी, मुंबई म.का. सदस्य इंद्रदास नेरपगार, मुंबई शाखा खजिनदार अनिल गवांदे, उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवर एकाच वेळी व्यासपीठावर आले. त्यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले, सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कल्याण शाखेचे सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती शासकिय पद्धतीने साजरी करण्यात यावी व संत नामदेव महाराज यांच्या राष्ट्रीय संत म्हणून समावेश व्हावा अशी मागणी मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेशभाऊ खैरनार यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री नामदार श्री कपिल पाटील यांना देण्यात आले, केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात शिंपी समाजाबद्दल व नामदेव महाराजांबद्दल आपले विचार मांडले. शिंपी समाजाबद्दल आपले असलेले प्रेम व्यक्त केले व समाज बांधवांना उद्देशून शिंपी समाज नसता तर जगाचे काय झाले असते, ज्याच्या हातात कैची व सुई दोरा दोघेही असतात तो काहीही करू शकतो. शिंपी समाजासाठी कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा हे सविस्तर माहिती दिली. शिंपी समाजाचा वतीने जी मागणी केली आहे ती तातडीने मुख्यमंत्री यांना अमलात आणण्यासाठी सूचना व शिफारस करतो असे आश्वासन दिले. त्याच्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विश्वकर्मा योजनेबाबत मिळणारे अर्थसहाय्य व प्रशिक्षणाची माहिती सविस्तरपणे दिली. व जास्तीत जास्त शिंपी समाजाच्या बंधू-भगिनींनी या योजनेच्या लाभ घ्यावा असे आवाहन केले. संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती व नाव शासन दरबारी नोंदणी करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असे पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी ठोस आश्वासन दिले. समाजाच्या विकासासाठी व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शिंपी समाजातील सर्व बंधू-भगिनींनी व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकत्रित होऊन समाज संघटन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आव्हान अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार यांनी यावेळी केले. कल्याण समिती समाजाचे जेष्ठ व श्रेष्ठ कल्याण व ठाणे जिल्ह्यतील समाजाचे संघटन करून समाजाच्या प्रगतीसाठी नेहमी तत्पर असणारे, राज्य संघटक कृष्णाजी मांडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कल्याण शिंपी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत महाजन यांनीही कल्याण शिंपी समाजासाठी मी सदैव तत्पर राहून समाज कार्यालयाचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तनमन धनाने सक्रिय राहील असे सांगितले. उपाध्यक्ष सचिव गणेश साळवे, खजिनदार प्रवीण भांडारकर, सल्लागार कृष्णाजी मांडगे, रवींद्र नेरपगार, सुभाष बाविस्कर, सहसचिव किशोर बागुल खजिनदार प्रवीण भांडारकर, सह खजिनदार सुरेश जगताप मंडळाचे सदस्य सुनील मांडगे, शिवदास शिंपी, काशिनाथ शिंपी, दत्तात्रय निकम, डी.जे. खैरनार, शिरीष भांडारकर, कल्याण शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.मंगला पवार, यांच्या सह समाजसेविका संध्या निकम आणि सर्व महिला मंडळाच्या समाज भगिनींनी यांनी विशेष परिश्रम घेतले.संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.जितेंद्र भामरे व मनिषाताई शिंपी यांनी केले. कल्याण शिंपी समाज उन्नती मंडळाची वाटचाल व पुढील नियोजनाबाबत ची माहितीचे प्रास्ताविक अरविंद शिंपी यांनी केले.कल्याण शिंपी समाजाचे सल्लागार रविंद्र नेरपगार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रगीता नंतर शेवटी कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *