• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Jan 17, 2024

Loading

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हा

गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत अमळनेर तालुका मुख्याध्यापक सहविचार सभा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
राज्यातील सर्व शाळांमध्ये 1 जानेवारी पासून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. शाळेकडे ओढा वाढावा. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यात शाळेबद्दल आत्मियता वाढावी, याकरिता हे अभियान महत्वाचे आहे. त्यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्वच शाळेतील मुख्याध्यापक यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी व्हावे असे
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी
अमळनेर येथील मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करतांना जी.एस.हायस्कूल अमळनेर येथे सांगितले
दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. रावसाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली
तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे मुख्याध्यापक यांची सहविचार सभा सकाळी 02:00 मिनिटांनी
जि.एस. हायस्कूल, अमळनेर येथे घेण्यात आली. व्यासपीठावर माननीय अध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी, श्रीम. कविता सुर्वे, विस्तार अधिकारी सर्व केंद्रप्रमुख सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री. रवींद्र पाटील यांनी केले. प्रस्ताविकात सदरचे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होत असल्याने सरल पोर्टलवर शाळेचे रजिस्ट्रेशन आजच करावे असे सांगितले.श्री.निलेश पाटील तंत्रस्नेही शिक्षक यांनी प्रत्यक्ष सरळ पोर्टलवर कशी नोंदणी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविले.
सदर अभियानाचे उिद्दष्ट शासन निर्णय 30 नोव्हेंबर 2023 मध्ये विषद केलेले आहे. सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवले जात आहे. आज अमळनेर तालुक्यातील 207 शाळांचे मुख्याध्यापक या ठिकाणी सभेसाठी उपस्थित आहे. सर्व शाळांनी या उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य आहे, या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 60 गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी 40 असे 100 गुण असून त्यानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. कविता सुर्वे यांनी 30 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयाचे वाचन केले. प्राथमिक तसेच तालुकास्तरीय मूल्यमापन समितीची रचना याबाबत सांगितल तसेच सदर अभियानाची उिद्दष्टे अभियानाचे स्वरूप, घटक निहाय दिलेले गुणदान शाळांनी अंमलबजावणी करावयाचा कालावधी, बक्षिसाचे स्वरूप याविषयी सखोल मार्गदर्शन केले,
त्यानंतर माननीय विविध स्पर्धा बाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांना जबाबदारी सोपविली व 25 जानेवारी रोजी
राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे विषयी संबोधन केले. निबंध, वकृत्व व इतर स्पर्धा घेताना तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी यांना सहभागी करून घ्यावे असे प्रतिपादन केले. त्यानंतर माननीय अध्यक्ष श्री.रावसाहेब पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नव भारत साक्षरता अभियान, निपुण भारत गुणवत्ता विकास कार्यक्रम, वाचन महोत्सव, अध्यन प्रक्रियेचे व्यवस्थापन, शाळातील भौतिक सुविधा, DPDC मंजूर कामे, बाला उपक्रम, समग्र शिक्षा अंतर्गत येणारी कामे व शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी
अंमलबजावणी व कॉपी मुक्त अभियान याबाबत शाळांचा आढावा घेवून सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व मुख्याध्यापक यांना आवाहन केले की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान शासनाचा उपक्रम न समजता हा उपक्रम आपल्या शाळेचा आहे, समजून यशस्वीरित्या हा उपक्रम राबवावा.
या सभेला सदर उपक्रमाबाबत विस्तृत चर्चा होऊन शासन निर्णयातील मुद्दे व उद्देशानुसार कार्यवाही होईल या दृष्टीने मुदतीत सर्व मुख्याध्यापक यांनी तयारी करून घ्यावी, असे सूत्रसंचालक श्री. शरद सोनवणे, केंद्रप्रमुख यांनी केले. सदर सभेत सर्व व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विविध शिक्षक संघटनेचे सदस्य
सर्व विषय तज्ञ व विशेष शिक्षक उपस्थित होते. शेवटी आभार श्री. अशोक सोनवने केंद्रप्रमुख यांनी केले व सभेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed