• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधी
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Feb 4, 2024

Loading

महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधी
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

नोबेल फाउंडेशन व भवरलाल अंड कांताबाई जैन फाउंडेशनचा प्रकल्प.
नाशिकचा सुमित देवरे, यवतमाळचा ईशान तारक राज्यात प्रथम तर जळगावची श्रेया महाजन राज्यात दुसरी.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
2023 हे वर्ष चांद्रयान-3 आणि मिशन आदित्य एल-१ या इस्रोच्या मोहिमांमुळे नेहमी लक्षात राहील. याच वर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तब्बल 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीचा आनंद घेता येणार आहे. जळगाव येथील विज्ञान क्षेत्रात अग्रणी असणारी संस्था नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्यातर्फे दरवर्षी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेच्या माध्यमातून आजपर्यंत 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी इसरो सहलीचा आनंद घेतलेला आहे. सदर विद्यार्थ्यांना यावर्षी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे विक्रम साराभाई स्पेस सेंटर आयआयटी गांधीनगर आयआयएम अहमदाबाद सायन्स सिटी अहमदाबाद इत्यादी उच्च तंत्रज्ञान विषयक संस्थांना सहलीची संधी मिळणार आहे.
पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये संपन्न झालेल्या या परीक्षेत इयत्ता पाचवी ते सातवी या अ गटात नाशिक येथील सुमित किशोर देवरे राज्यात प्रथम तर जळगावची श्रेया प्रशांत महाजन, ठाण्याची मनस्वी राजेश राज्यात द्वितीय, ठाणे येथील ध्रुव किरण महाडिक व जळगावचा श्लोक खाबिया राज्यात तृतीय श्रेणीने उत्तीर्ण झालेली आहेत.
इयत्ता आठवी ते दहावीच्या ब गटात नांदेड येथील कृष्णा भाऊराव टाले राज्यात प्रथम क्रमांकाने तर यवतमाळ येथील ईशान तारक राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. गट क मध्ये जळगाव येथील श्रुती राजेंद्र खैरनार राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना परीक्षेचे संचालक विज्ञानाचे कार्यकर्ते जयदीप पाटील म्हणाले की, “विज्ञान व तंत्रज्ञान हा एकविसाव्या शतकाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानात पारंगत होण्यासाठी इसरो आयआयटी सारख्या उच्च संस्था शालेय वयात बघणे जीवनाला प्रेरणादायी ठरते. यासाठी हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे”
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,अतुल जैन ,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील,आयएएस राजेश पाटील,कपिल पवार,डॉ. प्रमोद माहुलीकर आदींनी यशवंतांचे अभिनंदन केले.
2024 साठी या परीक्षेची प्रवेश प्रक्रिया www.nobefoundation.co.in या संकेतस्थळावर सुरू झालेली असून नोंदणीचे आवाहन राज्य समन्वयक संतोष पवार ,अमोल पवार,राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्रातून इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी-
इयत्ता – 5वी
ध्रुव किरण महाडिक (ठाणे)
अंकित स्वप्नील डाखोले (यवतमाळ)
पिहू मोहित ठोकाळ (यवतमाळ)
श्लोक सचिन लगड (बीड)
वेदांत नितीन सावरकर (अमरावती)
आरुष निशांत पगार (नाशिक)
शौर्य संतोष रेखाटे (अमरावती)
वेदांत प्रदीप चौधरी (नाशिक)

इयत्ता 6 वी –
मनस्वी राजेश (ठाणे)
श्लोक योगेश खाबिया (जळगाव)
मिहीर राजेंद्र टंक (अमरावती)
नुमान इरशाद शेख (उस्मानाबाद)
रोहन संजीव भोळे (पुणे)
विभोर अजितकुमार वाणी (जळगाव)
श्रावणी मिलिंद भगत (अमरावती)
श्रावणी आनंद मेने (हिंगोली)
कपिष पवन कुमार अग्रवाल (नाशिक)
सर्वम प्रदीप म्हस्के (परभणी)
उन्नती लक्ष्मीकांत पवार (पुणे)
मुग्धा सचिन पाटील (पुणे)

इयत्ता 7 वी –
सुमित किशोर देवरे (नाशिक)
श्रेया प्रशांत महाजन (जळगाव)
वरद प्रकाश देशमुख (जालना)
पार्थ संदीप तायडे (बुलढाणा)
कृष्णा अतुल देव (नाशिक)
आर्या विजेंद्र भोसले (परभणी)
रोहित युवराज पाटील (नंदुरबार)
मेघन संतोष वानखेडे (अमरावती)
युगंधर दिनेश भोसले (जळगाव)
तनिष्क नरेंद्र सरोदे (जळगाव)
राजेश्वरी परीक्षीत चव्हाण (जळगाव)
स्वरूपा सचिनकुमार हारे (बीड )
तन्मय तुषार पाटील (धुळे)
जिदिशा अमितकुमार सोमानी (जळगाव)
सोहम निलेश कोटगिरे (नांदेड)
अद्विक बुक्कावार (चंद्रपूर)

इयत्ता 8वी –
ईशान तारक (यवतमाळ)
गणेश बळीराम बरमे (नांदेड)
आदित्य शिवदास गिनेवाड (नांदेड)
शार्दुल मिलिंद येडगे (सातारा)
सम्यक राहुल शिरसाठ (औरंगाबाद)
रुद्रनिल शरद महाडिक (सातारा)
सुशांत प्रदीप झोरे (बुलढाणा)
दीक्षांत सुधाकर पाटील (औरंगाबाद)
अंतरा रोमहर्ष शिंदे (यवतमाळ)
समीक्षा निलेश्वर मालदे (गडचिरोली)
कृष्णा गणेश धामणकर (चंद्रपूर)

इयत्ता 9 वी
कृष्णापाटील भाऊराव टाले (नांदेड)
सिद्धेश शिवाजी मुसळे (बुलढाणा)
सदानंद राऊत (वाशिम)
कृष्णानंद किशोर पवार (अमरावती)
लाभेश हेमंत बाहेती (जळगाव)
उत्कर्ष दिनेश पाटील (जळगाव)
अथर्व संदीप पवार (नंदुरबार)

इयत्ता 10वी
हर्षित सुभाष पाटील (सातारा)
तेजस अरुण दामकुंडवार (नांदेड)
शौर्य विष्णू आव्हाड (नाशिक)
सुकेश व्यंकटराव जाधव (नांदेड)

इयत्ता 11 व 12वी
समृद्धी सुनील खाडे (कोल्हापूर)
समृद्धी संदीप पाटील (कोल्हापूर)
श्रुती राजेंद्र खैरनार (जळगाव)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन नोबेल फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा. जयदीप पाटील यांनी केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *