• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डॉ देशबंधू गुप्ता जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Feb 8, 2024

Loading

डॉ देशबंधू गुप्ता जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

धुळे-(राहुल माळी) स्वर्गीय डॉ देशबंधू गुप्ता यांच्या ८६ व्या जयंती निमित्त लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊडेशन संस्थे मार्फत भारतभरामध्ये सेवा दिवस साजरा करण्यात येत असतो. त्या अंतर्गत संस्थेच्या धुळे टीमने टीबी निर्मूलन मोहीम अंतर्गत ट्रूनेट मशीन ए सी पी एम वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हस्तांतरित करण्यात आले. सोबत गंभीर रुग्णासाठी लागणारे २ ऑक्सीजन केंद्रक यंत्र सुध्दा प्रमुख पाहुणे डॉ दत्ता देगावकर, जिल्हा शलयचिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे, डॉ सोनिया बागडे, धुळे जिल्हा क्षयरोग निर्मूलन अधिकारी, श्री योगेश राऊत, लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन पुणे यांच्या हस्ते ए सी पी एम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांना हस्तांतरित करण्यात आले
सदर कार्यक्रमास ए सी पी एम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे
डॉ ममता पाटील, सचिव, सौ संगीता पाटील, सह सचिव, डॉ नितीन कुलकर्णी, अधिष्ठाता, श्री नितीन थोरात आणि श्री अमोल दुसाने लुपिन फार्मास्युटिकल लिमिटेड, डॉ मृदला द्रविड, सूक्ष्मजीव शास्त्र विभाग प्रमुख, डॉ मधुकर पवार, वैद्यकीय अधीक्षक हे मान्यवर उपस्थित होते.
श्री निलेश पवार, जिल्हा व्यवस्थापक लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन धुळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना डॉ देशबंधू गुप्ता यांच्या सेवाभावी कार्याची माहिती आणि सदर कार्यक्रमाचे औचित्य विषद केले. डॉ मृदला द्रविड यांनी ए सी पी एम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची वाटचाल आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या क्षय रोग निर्मूलन साठी सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली आणि त्या साठी लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन संस्थेच्या मदतीचे स्वागत केले. श्री योगेश राऊत यांनी लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन संस्थेच्या आरोग्य क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि सर्वांना भविष्यातील सहयोगाची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ मधुकर पवार यांनी लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन संस्थेच्या मदतीचे महत्व सांगून आभार मानले आणि भविष्यातील सहकार्याचे आश्वासन दिले.
शेवटी डॉ तृप्ती देशमुख यांनी सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *