• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

विद्यार्थी,शिक्षक हितासाठी विलासरावांचे समर्पित योगदान; – खासदार डॉ. शोभाताई बच्छाव विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

May 14, 2025

Loading

विद्यार्थी,शिक्षक हितासाठी विलासरावांचे समर्पित योगदान; – खासदार डॉ. शोभाताई बच्छाव

विलासराव पाटील यांचा कार्यगौरव समारंभ धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
डॉ. शोभाताई बच्छाव यांनी उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त करत सांगितले की, विलासरावांनी ओ.बी.सी. समाजासाठी अत्यंत प्रभावी व समर्पक सेवा दिली आहे. म.न.पा. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थी उत्कर्ष समितीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके आणि गणवेष पुरविण्याचा त्यांच्या कार्याचा उल्लेख त्यांनी मोठ्या कौतुकाने केला. ते काँग्रेस पक्षाचे एक प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात असे सांगितले.

 

 

 

धुळे येथील म.न.पा. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा ओ.बी.सी. विद्यार्थी-शिक्षक-पालक विकास असोसिएशन व खान्देश वैधानिक विकास फोरमच्या संयुक्त विद्यमाने विलासराव पाटील षष्टब्दीपूर्ती गौरव समितीतर्फे षष्टब्दीपूर्ती सोहळा हिरे भवन, धुळे येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ठाणे येथील अ.भा. माळी महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. माळी होते. कार्यक्रमाचे उद् घाटन ओ.बी.सी. वित्त व विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा. डॉ. कैलासरावजी कमोद यांचे हस्ते करण्यात आले. विलासराव पाटील यांचा सन्मानपत्र व शाल देवून धुळे लोकसभेच्या खासदार मा.डॉ.सौ. शोभाताई दिनेश बच्छाव व धुळे ग्रामीणचे माजी आमदार मा. कुणालजी पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यगौरव पुस्तीकेचे प्रकाशन डॉ. दिनेश बच्छाव, मा. शिवदासजी महाजन पुणे, सौ. तारका सुभाष विवरेकर, अँड. कैलासजी वाघेला इंदूर, सुनिल माळी सेल्वासा, डॉ. शामराव फुले सुरत, युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, बापु खलाणे, विजय राउत, यु.डी.माळी, अविनाश पाटील, मिलींद सोनवणे, कैलास हजारे, एस.एम. पाटील, राजेंद्र खैरनार, अँड. सुधीर जाधव, वासुदेव देवरे, आर. के. माळी, निमेश सुर्यवंशी, श्रीमती मंदाकिनी पाटील, सौ. सिमा पाटील, अँड. सुनिल पाटील, विशाखा पाटील इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. कैलास कमोद म्हणाले की, “मी नाशिक विभाग निवड मंडळ सदस्य असतांना विलास भेटला. त्याच्या शिक्षकाच्या जागेवर तांत्रिक अडचण निर्माण झाली असे सांगितले. मी ती अडचण सोडवली व विलासला नोकरी मिळाली. त्यानंतर विलासने संपर्क कायम ठेवला ओ.बी.सी. साठी त्याचे काम मोठे आहे.” माजी आमदार कुणालजी पाटील म्हणाले की, नुकताच केंद्र सरकारने जातवार जनगणना करण्याचा निर्णय घेतला, या मागणीसाठी विविध संघटना प्रयत्न करत होत्या पण यात अग्रगण्य वाटा विलासराव पाटलांचा होता. ही मागणी त्यांनी खूप वर्षापासून लावून धरली होती. यासाठी त्यांनी मा. पंतप्रधानाना ११ हजार पोष्टकार्ड लिहून पाठविली होती. महानगरपालीकेच्या शाळेत नोकरी करीत असतांनाच माळी समाजाचे कार्य करीत राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत पोहोचले. धुळे
जिल्ह्याला भूषणावह काम केले. विलासराव पाटील याप्रसंगी म्हणाले, ” मला माझे आई व वडील यांचे सामाजिक संस्कार मिळाले. माझी आई काँग्रेस सेवादलाची कार्यकर्ती असल्याने विचारांचा वारसा लाभला. मला खूप चांगले लोक मिळाले. कै. चंद्रकांत पांढरे सर, कै. बालमोहन आदलिंगे, कै. संभाजी पगारे, कै. प्रा. हरि नरके, डॉ. कैलास कमोद यांचे ओ.बी.सी. व माळी समाजाचे काम करतांना मार्गदर्शन मिळाले
छगनराव भुजबळ व सुधाकरराव गणगणे यांचे राजकारणात मार्गदर्शन मिळाले. सहकारात एस. एम. पाटील व एस. के. चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले. या सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने आयुष्यातील साठ वर्षात खूप काही करता आले. अजुन काही काम शिल्लक आहे ते पूर्ण करायचे आहे.”
या प्रसंगी शिवदास महाजन, एस. एम. पाटील, अँड. कैलास वाघेला यांची समायोचीत भाषणे झाली. यानंतर विलासराव पाटील यांची व त्यांच्या आई श्रीमती मंदाकिनी शांताराम पाटील यांची ग्रंथतूला करण्यात आली. यासाठी समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष डॉ. एस.टी. पाटील, उपाध्यक्ष अँड. सुधीर जाधव, संजय पवार, सरचिटणीस प्रा. डॉ. संभाजी पाटील, चिटणीस काशिनाथ माळी सर यांनी शाल, बुके न आणता पुस्तके, ग्रंथ किंवा वह्या आणण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार उपस्थितांनी आणलेल्या साहित्यातून तुला करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना अविनाश पाटील यांनी केली. सुत्रसंचालन सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले. आभार प्रदर्शन काशिनाथ माळी सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिश्चंद्र रेंडे, राजेंद्र माळी, राजेंद्र गवळे, संदिप माळी, मनोज अहिरे, दिनेश खैरनार, शेखर पाटील, मुरलीधर बाविस्कर, बापू महाजन, डी.पी. महाले, वासुदेव माळी, मनोहर चौधरी, रूपेश माळी, किशोर माळी, देवगाव देवळी महात्मा फुले हायस्कूल चे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक ईश्वर महाजन, सुरेश महाजन, हरी माळी व शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील इ. नी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed