• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आर एल महाविद्यालयाचा एनएसएस युनिट तर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

Feb 8, 2024

Loading

आर एल महाविद्यालयाचा एनएसएस युनिट तर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

पारोळा( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त पारोळा शहर वाहतूक शाखा त्यांचा संयुक्त विद्यमाने, पारोळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांचा नेतृत्वाखाली, पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयीन एनएसएस छात्र शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगे आज पासून आयोजित करण्यात आले आहे.या उद्घाटन प्रसंगी, यावेळी ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ठाणे पालघर आणि नाशिक विभाग आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी वाहतूक पोलिस हवालदार दिपक अहिरे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.याविषयी अधिक माहिती दिली. आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मद्यपान गाडी चालवने कायद्याने गुन्हा आहे.तसेच हेल्मेट आणि सीट बेल्ट चा वापर करावा, गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे म्हणजे मृत्युला आमंत्रण देण्यासारखे आहे.शेवटी अहिराणी लोकगीत बोलून एनएसएस छात्र सैनिक यांचे मनोरंजन देखील शिंपी यांनी केले. उपप्राचार्य डॉ.वंदना पाटील यांनी विशेष सहकार्य करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि आभार व्यक्त केले. जळगाव जिल्हा आर एस पी समादेशक डॉ. ईश्वर के.पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियान सप्ताहाचे औचित्य साधून एनएसएस छात्र सैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.आणि महाविद्यालयिन विद्यार्थ्यासाठी वाहतूक सुरक्षा अतिशय महत्वाची यासाठी आमचे एनएसएस छात्र सैनिक वाहतुकीचा नियमांचे काटेकोरपणे पालन करतील आणि वाहतूक पोलिस विभागाला कायम सहकार्य करतील असे आश्वासन एनएसएस चे प्रकल्प अधिकारी प्रा.करंजले यांनी दिले. आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे उपक्रम समाजाचे रक्षण आणि देशाचे हितासाठी आहेत असेही संस्थेचे चेअरमन मा. खासदार काकासो वसंतराव मोरे यांनी या शब्दात विशेष कौतुक केले. प्रशासकीय अधिकारी तथा संचालक दादासो रोहन मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी आपल्या कॉलेजचे प्रा.डॉ.ईश्वर पाटील यांची आर एस पी अधिकारी युनिट जळगाव जिल्हा समादेशक पदी निवड करण्यात आली ही आमचासाठी अभिमानाची बाब आहे असे सांगून आर एस पी युनिट साठी आमचे कायम सहकार्य राहील असे यावेळी आश्वासन दीले. कनिष्ठ यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य, कार्यालय अधिक्षक संजय मोरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed