• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

श्री माऊली जय गजानन पॅनल निवडून आल्यानंतर सभासदांचे हित जोपासणार-

Feb 15, 2024

Loading

श्री माऊली जय गजानन पॅनल निवडून आल्यानंतर सभासदांचे हित जोपासणार

श्री माऊली जय गजानन पॅनल प्रमुख राजेंद्र पाटील, सचिन साळुंखे यांचे प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतसंस्था अमळनेर 2023 -2028 च्या पंचवार्षिक निवडणूक प्रचार कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आहे. रविवारी मतदान होणार असून प्रचार साठी फक्त एक दिवस उरला आहे.
श्री माऊली जय गजानन पॅनल प्रमुख व सर्व निवडणुकीतील उमेदवार यांचा प्रचार
शेवटच्या टप्प्यात आहे अनेक शाळांना भेटी देऊन सभासदांचे प्रश्न जाणून घेतले.
श्री माऊली जय गजानन पॅनल निवडून आल्यानंतर सभासद हिताचे निर्णय घेऊन पतपेढीच्या विकासासाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहणार आहे.. पतपेढीच्या विकासासाठी व सभासद हितासाठी आज तागायत ज्यांनी ज्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.. त्यांच्या विचारावर श्री माऊली जय गजानन पॅनलचे उमेदवार चालणार आहेत. पतपेढीचा विकास व सभासद हित जोपासले जाईल असे श्री माऊली जय गजानन पॅनलचे सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार तथा
हिंदी अध्यापक मंडळाचे तालुका अध्यक्ष आशिष शिंदे यांनी मराठी लाईव्ह न्युज शी बोलतांना सांगितले..
श्री माऊली जय गजानन पॅनल मध्ये अनुभवी उमेदवार असल्यामुळे काम करणे व सभासद हिताचे निर्णय घेणे सोपे जाईल असे पॅनल प्रमुख राजेंद्र पाटील,सचीन साळुंखे यांनी सांगितले..
श्री माऊली जय गजानन पॅनल मध्ये अत्यंत सोज्वळ,अभ्यासू अशी उमेदवार पॅनलमध्ये निवडणुकीत उभे आहेत ..त्यामुळे अमळनेर तालुक्यातील सर्व साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे सभासद बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे की योग्य उमेदवारांना व आमच्या श्री माऊली पॅनलला निवडून कपबशी या चिन्हावर शिक्का मारावा आपल्या
सेवेची संधी द्यावी असे आवाहन पॅनल प्रमुख यांनी केले आहे…

सर्वसाधारण मतदारसंघ
अनुक्रम नंबर ८
पाटील मुकेश अमृत
साने गुरुजी विद्यालय अमळनेर

अनुक्रम नंबर ९
पाटील परमेश्वर नानाभाऊ
कै बाबासाहेब देना पाटील हायस्कूल चोबारी

अनुक्रम १०
पाटील प्रमोद विनायक
खुशालदादा माध्यमिक आश्रम शाळा गडखांब

अनुक्रंमाक-१२
पाटील योगेश नाना
संत सोमगिर माध्यमिक विद्यालय भिलाली

अनुक्रंमाक-१३
साळुंखे सचिन वासुदेव
सु.व्हि. मुंदडे हायस्कूल मारवड

अनुक्रंमाक-१४
शिंदे आशिष दिलीपराव
बालाजी विद्यालय गांधली पिळोदे

महिला राखीव मतदार संघ

अनुक्रंमाक-३
जाधव प्रतिभा देवराम
माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप

इतर मागासवर्गीय प्रवर्ग मतदार संघ
अनुक्रंमाक १
पाटील राजेंद्र श्रीराम उर्फ राजू सर
स्व आबासो अनिल अंबर पाटील हायस्कूल मंगरूळ

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्ग मतदारसंघ

अनुक्रंमाक-१
जाधव प्रतिभा देवराम
माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप

वरील सर्व पँनलच्या
उमेदवारांना कपबशीच्या चिन्हावर फुलीच्या शिक्का मारून मतरुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन पॅनल प्रमुख्याने केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed