.
अखिल सुवर्णकार सखी मंच हळदी कुंकू कार्यक्रम व कार्यकारणी जाहीर…
अमळनेर येथील अखिल सुवर्णकार सखी मंचचे वर्धापनदिनी हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला .त्या कार्यक्रमांतर्गत महिलांना वार्षिक बक्षीस वितरणही करण्यात आले .तसेच महिला मंडळाच्या मार्गदर्शक व सल्लागार माननीय सौ. नीता अविनाश सोनार यांनी सन-2024 ची कार्यकारणी जाहीर केली . अध्यक्षा सौ. दीप्ती किशोर अहिरराव, उपाध्यक्षा सौ. पुनम संदीप भामरे यांची निवड झाली. कोषाध्यक्षा सौ नूतन भामरे ,सह- कोषाध्यक्षा सौ.शितल सोनार, तर सचिव पदी सौ मधुमती भामरे, सहसचिव सौ समिता भामरे ,सौ हर्षाली सराफ ,सौ.गायत्री सराफ व सल्लागार समितीत श्रीमती पुष्पाताई वानखेडे व श्रीमती देवयानी जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
