शिक्षकाचे चांगले काम हा त्याचा पुरस्कार-सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस डी देशमुख यांचे प्रतिपादन
साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन परिवारातर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिव पूजन व गुणवंत शिक्षकांचा सत्कार’ कार्यक्रम संपन्न…




अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. असे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस.डी.देशमुख यांनी पुरस्कार्थी शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले..
ते पुढे म्हणाले की प्रत्येक शिक्षकांमध्ये आत्मसन्मान हा असलाच पाहिजे. एक चांगला आणि प्रभावशाली शिक्षक तोच असतो जो चुकीच्या गोष्टीपुढे झुकत नाही. खरेपणाने आपली बाजू मांडतो आणि आत्मसन्मान कायम राखतो. शिक्षक जेव्हा चांगले काम करतो पालकांची हितगुज करतो व मदत करतो हाच त्याचा मोठा पुरस्कार आहे.आज उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले..अमळनेरला शिवजयंती निमित्ताने लोकशाही फाऊंडेशन व सानेगुरुजी विकास विचार मंचाच्या वतीने पुरस्कार्थी सन्मान सोहळ्यात सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस.डी.देशमुख अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना सांगितले…
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साने गुरुजी शै.विचारमंचचे मार्गदर्शक तथा साने गुरुजी नुतन विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक एस.डी.देशमुख सर यांनी भुषवले. प्रमुख अतिथी म्हणून मारवड हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य बी.एस.पाटील सर, तालुका विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष तथा पिंपळे हायस्कूलचे विज्ञान शिक्षक मा.श्री.जे.एस.पाटील सर, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले
निवृत्त प्राचार्य बी एस पाटील म्हणाले कि नवीन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सुजाण व समृद्ध घडविण्यासाठी प्रत्येक शिक्षक हा जीव ओतून काम करत असतो. त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व समाजाने लक्षात घेतले पाहिजे. शिक्षकांचा आदर केला पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमासाठी मला संधी मिळाली मी मनसवी भावुक झालो असे त्यांनी सांगितले तर
सत्कारार्थी शिक्षक प्रदीप कंखरे म्हणाले की शिवसेना फाउंडेशन व साने गुरुजी विचार मंचाच्या वतीने पुरस्कार ते शिक्षक बांधव व विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी मोठ्या मनाची माणसं लागतात अशीच माणसं समाजामध्ये चांगले काम करत असतात आणि चांगले काम करत असल्याची पावती नेहमीच समाज घेत असतो असे त्यांनी सांगितले
शिवजयंती चे औचित्य साधत “काटे पॅलेस” शिवशाही फाऊंडेशन कार्यालय, ढेकूसिम रोड अमळनेर येथे साने गुरुजी शै.विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन परिवारातर्फे… शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिव पूजन तसेच पुरस्कारार्थी व नेट परीक्षा उत्तीर्ण शिक्षक बंधू यांचा सत्कार’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सत्कारमुर्ती शिक्षक उमेश काटे
(म.फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार ),
निरंजनजी पेंढारे
(राष्ट्रीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक पुरस्कार),
ईश्वर महाजन (कविवर्य बहिणाबाई चौधरी आदर्श शिक्षक),शरदजी पाटील (म.फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार),प्रदिप कंखरे (नेट परीक्षा उत्तीर्ण),ए.बी.धनगर
(मौ.अबुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार) यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला..
यावेळी ग.स.जळगाव चे मा.संचालक वाल्मिक पाटील , व अमळनेर कृ.उ.बा.समिती चे मा.संचालक डी.ए.धनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचाचे ज्येष्ठ सदस्य रामकृष्ण बाविस्कर , रत्नाकर पाटील , सुनिता पाटील , दत्तात्रय सोनवणे, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, रविंद्र पाटील, गणेश बोढरे, विलास पाटील, राजेंद्र पाटील, गोपाल हडपे, विशाल देशमुख, बापूराव ठाकरे, सुधीर चौधरी, वेदांत सोनवणे व शाहूराजे काटे आदी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे सर तसेच मंचचे समन्वयक तथा आदर्श शिक्षक दत्तात्रय सोनवणे व सदस्य यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन खान्देश साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.कुणाल पवार यांनी केले व आभार डी.ए.धनगर सर यांनी मानले.