
अमळनेरला केंद्रस्तरीय गैरमार्गाशी लढा सहविचार सभा संपन्न!
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय केंद्र क्रमांक 3106 येथे गैरमार्गाशी लढा सहविचार सभा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी या सभेचे आयोजन केले होते. सदर सभा केंद्र संचालक श्री सुनिल पाटील सर यांनी निमंत्रित केली होती. यावेळी विद्यार्थी ,पालक, शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री.संदीप घोरपडे होते, तर प्रमुख पाहुणे शालेय समिती चेअरमन ॲड अशोक खंडेराव बाविस्कर, संचालक प्राचार्य डॉ ए जे शेख, माजी उपनगराध्यक्ष श्री.विनोद लांबोळे, मुख्याध्यापक श्री .सुनिल पाटील, उपकेंद्र संचालक श्री. विलास चौधरी व अनिसा पिंजारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रतिनिधी श्री.विलास चौधरी यांनी तर सूत्रसंचालन श्री. डी ए धनगर यांनी केले. यावेळी मार्च -2024 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरमार्ग रोखण्यासाठी प्रतिज्ञा श्री मनीष उघडे यांनी दिली. उत्तर पत्रिकेवर असलेल्या सुचनांचे वाचन श्रीमती विद्या पाटील यांनी केले.
केंद्र संचालक श्री. सुनिल पाटील यांनी केंद्रावर होणारे गैर मार्ग व ते रोखण्यासाठी काय करता येईल याविषयी तसेच विद्यार्थ्यांनी काय करावे व काय करू नये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात श्री.संदिप घोरपडे सरांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा ताणतणाव निवारण्यासाठी पालकांनी मदत केली पाहिजे. यावेळी ॲड श्री. अशोक बाविस्कर, डॉ ए जे शेख यांची मनोगते झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा विषयी असलेले भीती व शंका यांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी मृदुला खैरनार सेंट मेरी स्कूल व ज्ञानेश पाटील ग्लोबल व्ह्यू स्कूल यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सहविचार सभा संपन्न झाली. सभा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.