• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा.

Mar 5, 2024

Loading

अशीही पळवा पळवी
आता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!
शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा.

(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन )

निवडणूक म्हटलं की प्रचार हा आलाच! आणि प्रचाराचा सर्वात स्वस्त आणि मस्त साधन म्हणजे सोशल मीडिया आणि सर्वसामान्याच्या हातात आहे तो सोशल मीडिया म्हणजेच मोबाईलवरील वँटसअँप ग्रुप. मोबाईल वरील वॅटसअँप ग्रुपवर आपले संदेश पाठवून आपल्या सहकाऱ्यांना एकत्र करण्याची एक नामी संधी उमेदवाराला व त्यांच्या नेत्यांना मिळत असते आणि यामुळेच सर्वात महत्त्वाचा असलेला वॅटसअँप ग्रुप वरती आपल्या सदस्यांची जंत्री वाढवण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न चालू असतो आणि यामुळेच की काय ग्रुप वरती समूह प्रशासक म्हणजेच ग्रुपवर एडमिनचे महत्व फार मोठं असते.

मुंबईत झालेल्या नुकत्याच राजकीय पक्ष प्रवेशात नंतर एका शिक्षक ग्रुपवरती सदस्यांना काढणे व आपल्या समर्थकांना ग्रुपवर समाविष्ट करणे, नवीन सदस्यांची एडमीनपदी नियुक्ती करणे असा प्रकार सुरू झाला आहे व शिक्षक सुध्दा राजकारणात आम्ही सुद्धा काय कमी नाही? हे दाखवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
जुन्या सदस्यांना काढल्यामुळे आम्ही ग्रुप निर्माण केला आम्ही, आम्ही संघटना तयार केली, आम्ही शिक्षक ग्रुपवर असताना आम्हाला ग्रुपवरून काढायची हिंम्मत कशी होते? आमच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा प्रकारची आरोळी शिक्षक होळीपुर्वीच देत आहेत.
उद्या हा वॅटसअँप ग्रुप कोणाचा? यांचे प्रतिक म्हणजे ग्रुपवरील चित्र काय असेल? कोण काय पोस्ट करेल? याची व्यवस्था होईल काय? असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. राजकीय पक्षाचे चिन्ह व नाव चोरीला जात होते आता तर वॅटसअँप ग्रुप बळकावले जात आहेत, पळवले जात आहेत ही शक्कल मात्र शिक्षकांनी आपल्या पहिल्याच राजकारणातून दाखवून दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून कधी नव्हे इतका रंग यावेळी भरला आहे. शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत याचा अनुभव आला. महाराष्ट्रात शिमगा म्हणजे होळीचा उत्सव जवळ आला आहे. पण एकमेकांवर चिखलफेक व राजकीय रंग उडवून धुळवड मात्र आताच साजरी केली जात आहे. शिमग्या आधी राजकीय शिमग्याची जोर धरलेला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेले आहे. शिक्षक मतदारसंघांमध्ये सर्वच मोठे राजकीय नेते मोठ्या तयारीनिशी उतरले आहेत. बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांनी आप आपली शिक्षक संघटना कार्यरत केली आहे कुठे नाटकाचे शो चालले आहेत. तर कुठे डायरी वाटपाचा कार्यक्रम., कुठे मेजवानी तर कुठे साहित्यिक गप्पा यांच्या मार्फत शिक्षकांना एकत्र केले जात आहे. दुर्दैव म्हणजे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात सुद्धा राजकीय पक्ष प्रचार होत आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार सुभाष देसाई, कपिल पाटील, काँग्रेसचे नेते, एकनाथ शिंदे गट, या सर्वांचा वरदहस्त यांना लाभला आहे. मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटनेच्यावतीने आम्हाला मोठ्या नेत्याचा कसा आशीर्वाद आहे हे सुद्धा रसरशीत , रसभरत वर्णन करून सांगत आहेत.” मातोश्री “चा आशीर्वाद व “वर्षी” ची साथ सागर”भरून आहे. आपणच कसे” दादा” असे चित्र तरी सध्या पाहायला मिळते. (वर्षा, मातोश्री, सागर ही निवासस्थाने नाहीत) यासंदर्भात मी आज काहीच भाष्य करत नाही कारण राजकारणामध्ये कधी काय होईल? हे कोणाला कधीच सांगता येत नाही (अनेक पावसाळ्यात भिजले तरी) आज आपण ज्यांच्या बरोबर आहेत ते उद्या आपल्याबरोबर असतील काय? व आज आपण ज्याची निंदा केली त्याचीच आपण का स्तुती करत होतो? आज आपण काय करतो?शिक्षक म्हणून आपण चांगलाच “धडा “देतो आहेत अशा प्रकारची अवस्था आहे. यामध्ये मरतो मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता. या कार्यकर्त्याला फक्त नेत्यांच्या चटई उचलायचे आणि झेंडा हातात घेऊन त्यांचे नारे लावायचे एवढेच काम बाकी आहे? आणि असे असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यात हा सुशिक्षित सर्वात उच्च मतदार म्हणजे शिक्षक. सुजाण नागरिक. आजचे भविष्य तुमच्या हातात आहे. उद्याचा भारत तुम्हाला घडवायचा आहे. तुमच्या हातात भविष्याचे ” घड्याळ” आहे. लक्ष साधण्यासाठी “धनुष्य बाण” आहे. विद्यार्थ्यांचा ” हात आहे. चिखलात “कमळ” फुलण्याची ताकद आहे..

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरुवे नमः अर्थात गुरु ही ब्रह्मा है, गुरु ही विष्णु है

गुरु ही भगवान शंकर आहे। गुरु ही साक्षात परब्रह्म आहे । अशा गुरुला मी प्रणाम करतो।

उदय नरे :9892755311

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *