अमळनेर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही…
ना. अनिल पाटील यांचे प्रतिपादन
प्रभाग क्र.14 मधील ओमशांती नगर ते मुंदडा नगर गेट 1, मुंदडा नगर पाण्याच्या टाकी वरून 80 फुटी रिंग रोडचे भूमिपूजन
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विकास कामे करून सर्वात जास्त निधी आणल आहे. अमळनेर शहराची अस्मिता जोपासण्याचे काम सध्या विकास कामांच्या माध्यमातून सुरू आहे अमळनेर शहराला शिरपूर तालुक्यासारखा दर्जा प्राप्त करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील असे प्रतिपादन अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील ओम शांती नगर ते मुंदडा नगर गेट रिंग रोडच्या उद्घाटन प्रसंगी नामदार अनिल दादा पाटील बोलत होते..
ते पुढे म्हणाले कि अमळनेर शहरात दररोज नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी भविष्यात पाणी योजना आणली जाईल. पाडळसरे धरणाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे.. त्यासाठी लागणारे अडचणी दूर करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.. अमळनेर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास काम यांचे उद्घाटन व कामाचा धडाका सुरू आहे व भविष्यात असाच सुरू राहील यासाठी आपली साथ महत्त्वाची आहे..
शहराचा नगरसेवक हा महत्त्वाचा आहे तो जर प्रामाणिक काम करत असेल तर प्रभागाचा विकास होतो..युवा सामाजिक कार्यकर्ते रवी पिंताबर पाटील, प्रताप शिंपी, राजूभाऊ पाटील अशीही नगरसेवक प्रामाणिकपणे काम करत आहेत.. स्वतःसाठी काही न मागता नागरिकांच्या समस्या व प्रभागाच्या विकासासाठी ही मंडळी कटिबद्ध असतात… यांना मी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही.. आपणही आपल्या प्रभागात मतदार यादी मध्ये नाव नोंदवून आपलं नाव आहे का? याची खात्री करावी.. बऱ्याच वेळा आपण समस्या घेऊन जातो व पण आपले प्रभागात नाव नसते.. प्रभागात नाव राहिले तर तेवढ्याच प्रामाणिकपणे नगरसेवक काम करतो.. शहरातील रस्ते, ओपन प्लेस, हायमास्ट यांची लवकरच काम सुरू होऊन शहर सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कटीबद्ध राहणार आहे.. यासाठी आपण सहकार्य करावे असे मंत्री अनिलदादा पाटील यांनी सांगितले
अमळनेर शहरातील प्रभाग क्र.14 मधील ओमशांती नगर ते मुंदडा नगर गेट 1, मुंदडा नगर पाण्याच्या टाकी वरून, प्रसाद नगर, पाटील गढी, नागाई नगर, आर.के.नगर वरून धुळे रस्त्यापर्यंत 80 फुटी (रिंगरोड) रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा.महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार दादासो अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय संघटनेचे अध्यक्षा रिता बाविस्कर, भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, नगरसेवक राजूबापू पाटील, युवा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिंताबर पाटील, नगरसेवक आबासाहेब प्रताप शिंपी, राजू फाफोरेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शत्रूगण पाटील, मा. नगरसेवक संजय पाटीलसह विविध पक्षांच्या व संघटनेचे पदाधिकारी व प्रभाग 16 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन मुकेश पाटील सर यांनी केले.. उपस्थित मान्यवरांचा सत्कार युवा सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील व युवा काँग्रेसचे महेश पाटील यांनी केला..
प्रभाग सोळा मधील भावी नगरसेवक रवींद्र पितांबर पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले..








