“जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर” यांची पारोळा येथील’ परिश्रम मतिमंद विद्यालय’ येथे सदिच्छा भेट व त्या उपक्रमा अंतर्गत शालेय क्रीडा साहित्य वाटप
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक ०६/०४/२०२४ शनिवार रोजी नव्याने स्थापन झालेल्या जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांनी पारोळा येथील परिश्रम मतिमंद विद्यालय येथे सदिच्छा भेट देऊन तेथील मतिमंद विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाकरिता शालेय क्रीडा साहित्य वाटप केले. या दोरी उडी संच. लगोरी संच. फ्लाईंग डिशेस, कोस्कोबॉल, फुटबॉल, हॉलीबॉल, क्रिकेट बॅट, टेनिस बॅट, सिरॅमिक रिंग्स, बॅडमिंटन रॅकेट संच, शटल कॉक संच, काउंटिंग गोरी संच, कॅरम बोर्ड, शैक्षणिक चार्ट,, यांचे संच वाटप करण्यात आले, त्यासोबतच जायंट्स ग्रुपचे सेक्रेटरी प्रशांत पाटील यांनी या विद्यालयास पंधरा लिटरचे दोन खाद्य तेलाचे डबे ही देऊ केलेत.
तेथील शिक्षक श्री हेमकांत महाजन यांनी विद्यालयाची यशस्वी घोडदौड सांगितली आणि विद्यालयाचा संपूर्ण परिसर दाखवला. कुठल्याही प्रकारचा अनुदान नसताना या शाळेतील शिक्षक वृंद व इतर कर्मचारी समर्पण करून विद्यार्थ्यांची सेवा करतात हे बघून सर्व सदस्य अचंबित झाले.
विद्यार्थ्यांच्या हातात ज्यावेळेस या शालेय वस्तू दिल्या गेल्यात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात वर्णन करू शकणार नाही एवढा होता असे जायंट्स चे अध्यक्ष श्री सुनील पाटील यांनी आमच्या वार्ताहराशी बोलतांना केला.
जायंट्स चे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रुपला वरून कुठलाही निधी प्राप्त होत नाही परंतु एक समाज ऋण फेडण्याच्या दृष्टीने एक नव विचारसरणीचे तरुण एकत्र येऊन सह उपक्रम सहभाग रक्कम गोळा करून असे विविध उपक्रम राबवत असतात.
याप्रसंगी उपस्थित जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेर चे अध्यक्ष व श्री गणेश पॅथॉलॉजी लॅब चे संचालक सुनील पंडितराव पाटील, उपाध्यक्ष रमेश पंढरीनाथ महाजन, सेक्रेटरी प्रशांत भटू पाटील, कोषाध्यक्ष एडवोकेट राजेंद्र भगवान चौधरी, मार्गदर्शक मंडळाचे प्रोफेसर उदय गंगाधर देशपांडे सर, तसेच प्रोफेसर प्रवीण रणछोडदास भावसार सर, सदस्य संतोष हरी वाघ, डॉक्टर निलेश यशवंत शिंगणे, महेश बारकू पाटील, संदीप महाजन सर हे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
जायंट्स ग्रुप अमळनेरच्या शालेय क्रीडा साहित्य वाटपामुळे तेथील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक वृंद व इतर कर्मचाऱ्यांनी या ग्रुपचे आभार मानले .

