• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्यसचिव मा.एस.डी. भिरुडसर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज माध्यमिक विभाग वेतन अधीक्षक कार्यालयात तातडीची सभा

Apr 8, 2024

Loading

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्यसचिव मा.एस.डी. भिरुडसर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज माध्यमिक विभाग वेतन अधीक्षक कार्यालयात तातडीची सभा 40 ते 45 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह आज दि.8/4/2023 सोमवार रोजी घेण्यात आली…यावेळी वेतन पथक कर्मचारी अमोल महाजन यांच्या कामातील हलगर्जीपणा व आर्थिक मागणी बाबत च्या अनेक तक्रारी सादर करून सिद्ध करण्यात आल्या..शिक्षकांचे अनेक बिले निघाली नाही व शासनाकडे साडेसहा कोटींचा निधी परत गेला…कार्यालयातील इतर कर्मचारी यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली..वेतन अधीक्षक श्री.राजमोहन शर्मा यांनी सम्पर्क उत्तरे दिली नाही…त्यामुळे पूर्ण कार्यालयात साहेबांशी कर्मचारी यांची मिलीभगत आढळून आली….अनेक शिक्षकसंघटना पदाधिकारी यांनी कार्यालयीन कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली….व अमोल महाजन यांच्यावर वरिष्ठ कार्यालयात कारवाई ची मागणी प्रस्थापित करण्यात आली..यावेळी सदरील मिटींगला आर.एच.बाविस्कर,जे.पी.सपकाळे.,शैलेश राणे,,सुनील गरुड,डी.ए.पाटील,डिगंबर पाटील,अरुण सपकाळे,सिद्धेश्वर वाघूळदे ,मंगेश भोईटे,गोपाळ महाजन, एन.ओ.चौधरी, गिरीश भारंबे, प्रदीप वाणी,शंकर वाणी ,हरीश तळेले,राहुल वराडे.,एस.के.पाटील,चंपालाल चौधरी, दिनेश पाटील,सुनील तायडे, महेंद्र पाटील,संदीप डोलारे,भरत चौधरी,सुशील झोपे, शिरीष नेमाडे,मनोज वाघ,सतीश पवार, उपस्थित होते तसेच… मुख्याध्यापक संघ,माध्यमिक शिक्षक संघ,शिक्षकेतर संघ,कलाध्यापक संघ,महाविद्यालयीन ज्यूकटो संघटना,, यांचे पदाधिकारी उपस्थित होते