• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

धरणगाव विकास मंच द्वारा दिलेल्या निवेदनाला नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद

Apr 9, 2024

Loading

धरणगाव विकास मंच द्वारा दिलेल्या निवेदनाला नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद

धरणगाव प्रतिनीधी —

धरणगाव : शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या विविध वाढत्या स्वरूपातील समस्यांच्या संदर्भात त्यांच्या भावना लक्षात घेत “धरणगाव विकास मंच” द्वारा समस्यांचे लेखी निवेदन दि.४ एप्रिल २०२४ रोजी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी साहेब यांना दिले होते. धरणगाव विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. पारधी साहेब यांनी निवेदनाची दखल घेत तात्काळ धूसर/ मळकट झालेल्या राष्ट्रध्वजाचे ध्वजावतरण केले. धरणी नाला परिसरात व गावातील इतर भागात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी केली. सोनवद रस्त्यावरील स्मशानभूमी जवळील पथदिवे सुरू केलेत. शहरातील विविध भागात गटारी स्वच्छ करण्यात आल्या तसेच अन्यत्र भागात पाईप लाईन चे लिकेज बंद करण्यात आले. अश्या पध्दतीने नगर परिषदकडून कामाला गती मिळाली आहे. न.प.प्रशासनाने निवेदनाची योग्य दखल घेऊन त्वरित उपाययोजना केल्याबद्दल प्रशासनाचे धरणगाव विकास मंचकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
आतापावतो शहरातील विविध भागात समस्यांचे निराकरण झाल्याबाबत नागरिकांकडून जाणून घेत उर्वरीत समस्या नगरपालिका लवकर निकाली काढेल, अशी अपेक्षा धरणगाव विकास मंच चे पदाधिकारी व सर्वसामान्य धरणगावकर करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *