• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा

Apr 9, 2024

Loading

राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

राज्यसभा, विधान परिषद याची मला गरज नाही. सक्षम नेतृत्वासाठी मी नरेंद्र मोदीना पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देत आहेत अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून केली. अठरा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झाली. गेली अनेक वर्ष मनसेचा गुढीपाडवा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे होत असतो. साऱ्या राज्याचे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष लागलेले असते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत आहे अशी घोषणा केल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पारडे सध्यातरी जड झालेले दिसते आहे. पाठींबा देत असताना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीची लागा अशा सूचनाही राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना दिल्या. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे हे दिल्लीला जाऊन इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची भेट घेतली होती परंतु प्रसारमाध्यमातून राज ठाकरे दिल्लीला गेले अशा वावड्या उडवल्या, आणि दिल्लीला 12 तास वाट पाहत बसले अशा बातम्या चालल्या याचा खरपूस समाचार राज ठाकरे यांनी घेतला.
व्यभिचाराला राज्य मान्यता देऊ नका कारण ही लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य ठरणार आहे यामुळे नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सगळ्यात तरुण देश आपला भारत आहे. या तरुणांचे स्वप्न पंतप्रधानांनी पुर्ण केले पाहिजे अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. चांगल्या निर्णयाचे मी कायम समर्थनच केले संजय राऊत सारखी विनाकारण टीका करत नाही. राज ठाकरे यांचे भाषण संयमी होतं कोणत्याही पक्षावरती त्यांनी ताशेरे उडवले नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तव्यात मी राहिलो असल्यामुळे शिवसेना पक्षाबरोबरच माझे पहिल्यापासून संबंध होते भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन व नितीन गडकरी यांसारख्या नेत्यांशी माझे राजकारणापलीकडचे संबंध होते त्यामुळेच मला भाजपा या पक्षाशी आपलेपणा वाटतो अशी कबूलही भाषणामध्ये राज ठाकरे यांनी दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुका लढणार नाहीत हे आता स्पष्ट झाले परंतु भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्य भूमिका असणार आहे हे त्यांच्या भाषणातून आज स्पष्ट झाले राज ठाकरे लवकरच महाराष्ट्राच्या दौरा करणार आहेत नरेंद्र मोदींनी देशातील तरुणांकडे लक्ष द्यावे व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करावे अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *