
हसतमुख, अजातशत्रू सचिन खंडारेचा अखेरचा दुःखद निरोप
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सचीनभाऊ खंडारे यांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता आपल्या परिने मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव.कोणीही गरजू मनुष्य सचीनभाऊ गेले म्हणजे सदर माणसाला खरंच मदत करणे गरजेचे आहे का भाऊ ओळखतात आणि त्यातून मार्ग शोधून त्याला मदत करतात. आर्थिक असो सामाजिक शैक्षणिक असो त्या ठिकाणी बापू हजार… माणसे जोडणे हे बापूंना चांगले जमते .’मानसे तोडणे सोपे परंतु माणसे जोडणे कितीतरी अवघड’ बापूने आजपर्यंत माणसं वाचली व मैत्रीसाठी वेचली त्यांची मैत्री देखील निस्पृह व निस्वार्थी आहे .निरपेक्ष मैत्री जपणारा व माणसातील माणूसपण जपणारा हा दिलदार माणूस अचानक अल्पशा आजाराने त्यांचे निधन होते हि हृदयाला चटका देणारी घटना आहे या घटनेवर मित्रपरिवार यांचा विश्वास बसत नाही हे तेवढेच सत्य…
प्रताप महाविद्यालयातील जेष्ठ लिपीक ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी व पालकांचे प्रताप महाविद्यालयातील कुठलेही काम असो त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ,महाविद्यालयात काम करतांना प्रचंड कामाचा ताण असूनही आलेल्या प्रत्येक माणसाच्या समस्येचे निराकरण करुण कधीही आढेवेढे न घेता नेहमी आलेल्या प्रत्येकाला सकारात्मक प्रतिसाद देऊन,दुर्गा हाॅस्पिटलजवळ संत गजानन महाराजांचे भव्य दिव्य मंदिर व्हावे यासाठी त्यांनी रात्रदिवस मित्र परिवाराला घेऊन त्या ठिकाणी एक चांगली वास्तू उभी केली त्यांचे सामाजिक धार्मिक क्षेत्रातील योगदान हे उल्लेखनीय होते… मंदिरासाठी त्यांच्या मोठमोठे संकल्पना होत्या …इंदिरा गांधी शाळा परिसरातील नागरिकांसाठी अहोरात्र झटणारे,सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे,सर्वांशी सौजन्याने वागणारे एक संवेदनशील व प्रेमळ व्यक्तिमत्व,असे अनेक प्रसंग आहेत कि त्यामध्ये ते अनेकांच्या सुख दुःखात खंबीरपणे उभे राहिलेले आठवतात,परंतु त्यांचीच फक्त आणि फक्त आता आठवण मनात तेवत ठेवावी लागेल असे दिलखुलास,निगर्वी व सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व….
सामाजिक कार्याला नेहमी त्यांनी प्राधान्य दिले होते कोणताही प्रश्न असो लागलीस त्याची निरसन करणे हा त्यांच्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुण होता कधी रागवले नाही…. प्रत्येक व्यक्तीला मदत करणे हा त्यांचा स्वभाव धर्म होता…
मा.सचिनभाऊ मधुकर खंडारे यांची आज प्राणज्योत मालवली,अशा उमद्या व धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांस भावपूर्ण श्रद्धांजली,खंडारे परीवार व संपूर्ण परिसरावर जी शोककळा पसरली आहेत त्यात आम्ही जड अंतःकरणाने सहभागी आहोत.
अमळनेर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ,पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे.. तालुक्यावर शोककळा पसरल्यामुळे अनेकांच्या तोंडातून त्यांच्याबद्दल चांगल्या भावना व्यक्त होत्या.. त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो असा संदेश विविध क्षेत्रातून मान्यवरांनी व्यक्त केल्या…
*मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐*