निवडणुक निरीक्षक (खर्च) श्री. कुमार चंदन (IRS) यांची अमळनेर भेट
जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत अमळनेर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुकी संदर्भात घेतला आढावा


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दिनांक 20-04-2024 सकाळी 10.30 वा. 03 जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत 015 अमळनेर विधानसभा मतदार संघामध्ये मा. निवडणुक निरीक्षक (खर्च) श्री. कुमार चंदन (IRS) यांनी अमळनेर भेट देऊन निवडणुक खर्च विषयक पाहणाी केली. यात कंट्रोल रुम, खर्च पथक, एक खिडकी या ठिकाणी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच FST, VST, VVT आणि ACCOUNTING TEAM पथक प्रमुखांची बैठक घेऊन संबंधितांना कामकाजाच्या अनुषंगाने सुचना व मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर,
रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर, तुषार नेरकर मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर, प्रशांत धमके निवडणूक नायब तहसिलदार, व उपरोक्त नमुद पथकातील पथक प्रमुख व इतर कर्मचारी उपस्थित होते.