नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
शरद पवार यांना एनडीएत येण्याची आँफर
(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त)

शरद पवार यांनी एनडीए मध्ये यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिले.. तिसऱ्या टप्प्यातील मतदारानंतर नरेंद्र मोदी यांचा विश्वास ढळल्यामुळेच त्यांनी असे विधान केल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नंदुरबार येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. सोबत या स्वप्न पूर्ण होणार पंतप्रधान मोदींचं वाक्यावर तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीनंतर भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले यामुळेच नंदुरबार येथील सभेत त्यांनी मला एनडीए येण्याची ऑफर दिली अशी माहिती शरद पवार यांनी दिली. छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे असे वक्तव्य नुकतेच शरद पवारांनी केले होते त्यानंतर पवारांच्या या वक्तव्याला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे व अजितदादा बरोबर आमच्याकडे यावे आपले स्वप्न साकार करावे असे आवाहन शरद पवारांना केलेले आहे.
आमची विचारधारा गांधी- नेहरूंची आहे यामुळे कुठे जाणार नाही. नरेंद्र मोदी मुळे संसदीय लोकशाही संकटात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. पंतप्रधानांनी एखाद्या समाजा विषयी वेगळी भूमिका मांडली तर ते होणार राहणार नाही. या देशाचा हिताच नाही तिथे माझं सहकार्य नाही असेही शरद पवार म्हणाले. प्रधानमंत्री हे देशाचे असतात जो देशाचं नेतृत्व करतो त्यांनी एका धर्माविरुद्ध टीका करणे योग्य नव्हे. पंतप्रधानांशी माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहे परंतु राजकीय भूमिका वेगळी आहे. पार्लमेंट मध्ये आम्ही एकत्र बसतो. अजित पवार यांनी कार्यकर्त्याला दिलेली धमकी ही चुकीचे आहे. एखाद्याला निवडून देणे हा मतदाराचा हक्क आहे. राजकीय नेते हा हक्क हिरावून घेऊ शकत नाहीत अजित पवार बालबुद्धी ने बोलतात अशी टीकाही शरद पवार यांनी अजितदादावर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना एडीए मध्ये येण्याच्या आवाहना नंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली नसती तर नवलच.!