

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मतदार जनजागृती रॅलीस प्रचंड प्रतिसाद.
सर्व शिक्षक संघटना, RSP अधिकारी युनिट, शिक्षण मंडळाचा सक्रिय सहभाग-
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी )
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त सौ.इंदूरानी जाखड मॅडम यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता मनपा आयुक्त सौ.इंदुरणी जाखड यांचा हस्ते अवकाशात हायड्रोजन चे तिरंगा बलून सोडून मतदानाबाबत मतदार जनजागृती सामूहिक प्रतिज्ञा करून रॅलीची सुरुवात करण्यात आली.कल्याण डोंबिवली महानगरपालिका मतदार जनजागृती रॅलीस प्रचंड प्रतिसाद दिसून आला.
यावेळी कल्याण मधील सर्व शिक्षक संघटना, RSP अधिकारी युनिट, शिक्षण मंडळाचा सक्रिय सहभाग घेतला. यावेळी
विधानसभा मतदारसंघ 142 कल्याण पश्चिम व 138 कल्याण पूर्व नोडल ऑफिसर श्री.संजय जाधव साहेब
विजय सरकटे साहेब आणि सौ.देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड उत्साहात रॅली काढन्यात आली होती,सकाळी सात वाजता दुर्गाडी चौकातून वाहतूक पोलिस उपनिरीक्षक बडगुजर साहेब यांचा सिग्नल नुसार लालचौकी, सहजानंद चौक,शिवाजी चौक, पत्रिपुल मार्गे चक्कीनाका, तिसाई , कोळसेवाडी, वालधुनी कडून प्रेमऑटो,बिर्ला कॉलेज, भोईरवाडी, साईचौक येथून वसंतव्हॅली मुंबई विद्यापीठ उपकेंद्र अशी भव्य बाईक रॅली चा माध्यमातून मतदानाविषयी जागृती करण्यात आली. सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी संपूर्ण रॅलीत एकच जयघोष कानावर पडत होता ,
मतदान राजा जागाहो,लोकशाहीचा धागा हो. अश्या प्रकारचा घोषणा देत खडकपाडा वसंतव्हॅली परिसरात मुंबई विद्यापीठ उपकेंद्र येथे शिक्षण प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, महानगरपालीकेचे अधिकारी , कर्मचारी, महाविद्यालये, शाळा मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, एनएसएस, एनसीसी चे छात्र सैनिक, RSP अधिकारी शिक्षक युनिट शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग प्रमुख प्रशांत भामरे ,गुलाबराव पाटील, विलास जाधव, चव्हाण सर, विकास पाटील,बाळकृष्ण जगे यांच्यासह सर्वांचे आभार व्यक्त केले. मतदान जांगृती रॅली यशस्वी करण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांच्यासह कल्याण डोंबिवली समादेशक अनंत किनगे, बंशिलाल महाजन,जितेंद्र सोनवणे, हंडाळ सर, जोगमार्गे सर, दत्तात्रय पटवर्धन, ओमप्रकाश धनविजय,सरोदे सर, स्वच्छ भारत अभियान टीम चे प्रमुख मृत्युंजय शुक्ला, यांच्यासह शिक्षक बंधू, यांनी विशेष परिश्रम घेतले.कल्याण पश्चिम वाहतूक पोलिस निरीक्षक शिरसाठ साहेब यांचा संपूर्ण स्टॉप चा सहकार्याने मतदान जनजागृती रॅली शांततेत, यशस्वी झाली त्याबद्दल वाहतूक पोलिस विभागाचे देखील कल्याण डोंबिवली मनपा नोडक अधिकारी यांचा तर्फे जाहीर आभार व्यक्त केले.