

अमळनेर नगरपरिषद मार्फत मालमत्ताकर व पाणीपट्टी थकबाकीदारांवर धडक कार्यवाही.
अमळनेर प्रतिनिधी
सन- २०२३-२४ अखेर मालमत्ताकर व पाणीपट्टीकर थकबाकीदारांवर वसुलीसाठी कडक कार्यवाही करण्यात येत असून त्यात जवळपास २० नळ कनेक्शन कट करण्यात आले असुन ५ पाण्याचे पंप्प जप्त करण्यात आलेली आहे.व २ व्यापारी दुकानांना सिल करण्यात आलेले आहे.तसेच ४,६५००० रोख रक्कम रुपये वसुल करण्यात आलेली आहे.
सदर कार्यवाही हि म.मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, कर अधिकारी रवींद्र चव्हाण, फिल्टर निरीक्षक गणेश शिंगारे, कृष्णा जाधव, फिरोज पठाण, सोमचंद संदानशिव, प्रसाद शर्मा, शेखर देशमुख, साजिद शेख, सतीष बडगुजर, जगदीश चौधरी, प्रवीण शेलकर, तसेच इतर वसुली कर्मचाऱ्यान मार्फत मोहीम राबविण्यात येत आहे. तरी मालमत्ताकर व पाणीपट्टीकर थकबाकीदारांनी नगरपरिषद कडे त्वरित भरणा करून जप्तीची व नळ संयोजन बंद करण्याची कार्यवाही बंद करावी असे आवाहन म.मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे मार्फत करण्यात आलेली आहे.