
मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांचे मतदारांना आवाहन!
भिवंडी.दि.१९ (मनिलाल शिंपी)
भिवंडी शहर व तालुक्यातील जंम्बो कार्यकारणी असलेल्या
भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पत्रकार पदाधिकारी यांच्या वतीने नुकताच झालेल्या संघाच्या बैठकीतून सर्वानुमते भिवंडी शहर व ग्रामीण भागातून सर्व मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत सर्व मतदारांनी
मोठ्या संख्येने आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे आवाहन भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी व सर्व संघाच्या वतीने केले आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही सर्व पत्रकार आमच्या लेखणीतून समाज प्रबोधन करून समाजातील दुर्बल घटकांन पर्यंत पोहचून त्यांना न्याय मिळऊन देण्याचे काम करीत आहोत.त्याच बरोबर समाज जागृतीही करीत आहोत. आपला भारत देश जगातील लोकशाही प्रणाली राबविणारा मोठा देश आहे. आपल्या राज्य घटनेने सर्व भारतीयांना समान आधिकार दिलेले आहेत. लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे हे ध्यानात घेवून, आपल्या बहुमोल मताचा उपयोग आपण सर्व मतदारांनी केला पाहीजे.
देशात ताठ मानेने उभा राहील असा लोक प्रतिनिधी असावा यासाठी प्रयत्न करणारे नेतृत्व आपल्याला निवडून द्यावे लागेल अशा तर्हेचा संदेश पत्रकारांनी समाजापर्यत पोहोचवला आहे.यावेळी
संघाचे संस्तूअध्यक्ष अध्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, कार्याध्यक्ष दैनिक पुण्यनगरी च्या प्रतिनिधी श्रीमती कुसुमताई देशमुख, सचिव जागृत रिपोर्टर चे प्रतिनिधी श्री अफसर खान, खजिनदार पदी दैनिक उतरशक्तीचे प्रतिनिधी आचार्य सुरजपाल यादव, उपाध्यक्ष सत्यवार्ता टी.व्ही. न्यूज चे संपादक श्री.लवलेश सुतार, सहसचिव दैनिक सकाळ व महाराष्ट्र दिन चे प्रतिनिधी श्री.दीपक हिरे,सह खजिनदार साप्ताहिक संजीवनी समाचारच्या संपादिका श्रीमती परवीन खान, सल्लागार ज्येष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र काबाडी,श्री.अरुण मिश्रा, श्रीमती संध्याताई पवार,कार्यकारिणी सदस्य श्री. सोमनाथ बाळाराम ठाकरे,सौ. निलम तिवारी, श्री.चंद्र प्रकाश इ कोलतिवारी,श्री.रवी तिवारी, श्री.संतोष सोनी,श्री.भूपेंद्र आंबवणे. श्रीनिवास सिरीमल्ली,संदीप गुप्ता,मेहंदी हसन,शशी वर्मा,राजेंद्र पाटील,रमण पंडित, व आदी पत्रकार उपस्थित होते.