
डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेची शंभर टक्के उज्वल यशाची परंपरा कायम ——
पारोळा —-
वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ संचलित, डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर ता. पारोळा येथील इयत्ता बारावी कला व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे गेल्या चौदा वर्षापासून जुनिअर कॉलेजचा शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.
इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत
प्रथम क्रमांक: शितल हेमंत जाधव 76.33%,
द्वितीय क्रमांक:- नम्रता लक्ष्मण पवार 74.50%
तृतीय क्रमांक:- धनश्री आप्पा जाधव 74.33%
इयत्ता 12 वी कला शाखेत
प्रथम क्रमांक:- अंजुबाई रोहिदास जाधव 75.50%,
द्वितीय क्रमांक:- जाधव कैलास गणेश 74.17%,
तृतीय क्रमांक – राठोड बादल राजू 73.33% यांनी वरील गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष देशमुख जाधव प्राचार्य जी. एस. पाटील , मुख्याध्यापक सोपान पाटील,जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे ,प्रा. हिरालाल पाटील, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. विजय बेहरे, प्रा. तिरुपतीकुमार वारुळे, प्रा. शरद देवरे, प्रा. एम. एन. कुवर,प्रदीप मोरे,रघुनाथ येंडाईत,दिपक पाटील, विकास वसतकार आदी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याने वसंतनगर सह भोलाणे, पिंपळकोठा येथील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.