रा .का मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय बहादरपूर येथून कु.पालवी विजेंद्र पाटील उच्च माध्य. प्रमाणपत्र परीक्षेत सर्वप्रथम.

अमळनेर प्रतिनिधी
नुकताच इ.12 वी चा ऑनलाईन निकाल लागला असून नूतन शिक्षण संस्था बहादरपूर संचलित रा . का . मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान विभागातून 88.17% गुण मिळवून कु. पालवी विजेंद्र पाटील सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
यापूर्वीही पालवीने मार्च 2022 मधे इ.10वी तून 93.00 गुण मिळवून सेंट मेरी हायस्कूल अमळनेर येथून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
यापुढें भविष्यात पालवी ने स्वप्रेरणेतून वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा मानस ठेवला आहे.
शाळेचा एकूण निकाल 89.33 % लागला असून विज्ञान विभागाचा निकाल 98.18 % लागला आहे . विज्ञान विभागातून 88.17% गुण मिळवून कु पाटील पालवी विजेंद्र प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली . पाटील भूपेंद्र अरुण हा विद्यार्थी 81.17% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर तृतीय क्रमांक विसपुते भूषण मनोज याने 80.17% गुण मिळविले आहेत .
कला विभागाचा एकूण निकाल 75.55% एवढा लागला असून प्रथम चौधरी महेश दिलीप 73.17 % द्वितीय भोई मनिष सुरेश 70.33% व तृतीय क्रमांक पाटील उमेश भाईदास 69% गुण मिळवले आहेत .
वाणिज्य विभागाचा निकाल 85.18 % लागला असून प्रथम कु पाटील गायत्री ईश्वर 69.17 % द्वितीय कु चव्हाण हर्षाली विनायक 68.33 % तर तृतीय कु सैयद मेहेकबी ईकबालअली 67.17 % गुण मिळवले आहेत .
नूतन शिक्षण संरथेचे अध्यक्ष दादासो श्री उमेशचंद्र विलास वैद्य , उपाध्यक्ष जिभाऊसो श्री गंगाराम महाजन, व्यवस्थापक बापूसो डॉ.श्री .ए.आर.पाटील,कोषाध्यक्ष बापूसो श्री.बी.जी.चौधरी सर, सचिव दादासो प्रा.श्री.सुनिल दगडू मोरे संपूर्ण कार्यकारीणी तसेच प्राचार्य श्री.व्ही.जी.पवार,पर्यवेक्षक श्री.एस.बी.चौधरी, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतूक केले . तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .