
वि.या. पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे शाळेने 100% निकालाची परंपरा कायम ठेवली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक प्रमाणपत्र (10) परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2024 मधील आमच्या विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे ता. अमळनेर चा वार्षिक निकाल 100% लागला असून शाळेने दरवर्षीप्रमाणे उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
प्रथम तीन विद्यार्थ्यांचा निकाल खालील प्रमाणे
1) प्रथम क्रमांक कु. पूनम पंढरीनाथ पाटील
87.80%
2) द्वितीय क्रमांक चि. प्रशांत दगडू पाटील
86.40%
3) तृतीय क्रमांक चि. देवेंद्र योगेश वानखेडे
86.20%
वरील तीनही विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जयवंतराव मन्साराम पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून कौतुक केले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री एन.एस.पवार सर व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचे ,पालकांचे अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देखील दिल्यात.