

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख”डॉ . मनिलाल शिंपी”यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
अंध अपंग कुटुंबीयांना आज रेशन किट वाटप व मिष्टान्न भोजन कार्यक्रमाचे आयोजन!
ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक २९/५/२०२४ रोजी कल्याण परिसरातील अंध अपंग कुटुंबीयांना रेशन किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन सकाळी दहा वाजता स्वामीनारायण सभागृह शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे करण्यात आले आहे.
दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे, भोकरी गावचे उद्योजक समाजसेवक डॉ.रामचंद्र शांताराम देसले, तसेच उद्योजक, प्रेरणा निर्माण करणारे डॉ. किशोर अढळकर, जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण, मिडटाऊन सहेली ग्रुपच्या डिंपल मॅडम, यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी तांदूळ,गव्हाचे पीठ, गोडेतेल,कोकोनट ऑइल,साबण, साखर,चहा, तूरडाळ, मसुरडाळ,चहा पॉकेट अशा प्रकारे रेशन किट देण्यात येणार आहे, ” अंध दिव्यांग बंधु- भगिनींना” रेशन किट चे वाटप करण्यात येणार आहे.तरी शक्य असेल ती वस्तूरूप मदत करावी. असे आवाहन दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील
यांनी केले होते.त्यामुळे यासाठी दानशूर दात्यानी सडळ हाताने मदतीचा हात पुढे केला.त्यामुळे खालील सदस्यांनी मदत जाहीर केली आहे.ती खालील प्रमाणे
जायंट्स ग्रुप midtwon सहेली ( पोहे, साबण,)
डॉ.स्नेहल बोधे,सहेली ग्रुप(तेल),
डॉ.यशवंत अनंत म्हात्रे ( तांदूळ, डाळ)
सौ.संगिता पष्टे( अध्यक्ष , इच्छामनी भजनी मंडळ,) कोकोनट तेल बॉटल,
डॉ.किशोर अढळकर ( समाजसेवक, उद्योजक) नाश्ता,डॉ.sumya (dental care) साखर, अस्तित्व फाउंडेशन चा अध्यक्षा रश्मी शर्मा,
सदर कार्यक्रमाला
महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी गायक,कलाकार बिग बॉस फेम श्री.संतोष चौधरी उर्फ दादूस, व मराठी कलाकार गायक श्री. जगदिश पाटील यांच्यासोबत स्वामी दरबार नाट्याचे स्वामी आविष्कार श्री.मयुरेश कोटकर हे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.