• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सत्यशोधक समाज संघातर्फे प्रज्ञावंत सुकन्यांचा भावपूर्ण सत्कार उपशिक्षणाधिकारी नेतकर व साहित्यिक  यांनी केले सत्कार

Jun 4, 2024

Loading

:सत्यशोधक समाज संघातर्फे प्रज्ञावंत सुकन्यांचा भावपूर्ण सत्कार
[ उपशिक्षणाधिकारी नेतकर व साहित्यिक रूम यांनी केले सत्कार ]
‘ विविध समाजाचे होणारे जातीनिहाय खर्चिक गुणगौरव सोहळयांपेक्षा गुणवत्ता निहाय केलेले जात,धर्म,पंथविहीन अनौपचारिक सत्कार जास्त श्रेष्ठ ‘असे भावोद्गार निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी काढले.

सत्यशोधक समाज संघातर्फे दिनांक ४ जून २०२४ रोजी सन २०२३ / २४ वर्षातील माध्यमिक शालांत परिक्षेत उत्तुंग यशप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी अनपेक्षित जाऊन प्रज्ञावंत सुकन्यांचे कौटुंबिक वातावरणात सत्कार सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे करण्यात आले.भवरलाल अँन्ड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी अश्विनी समाधान हरसोडे हिने ९३.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल अश्विनीचा सत्कार निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते शाल व प्रेरणादायी पुस्तके देऊन भावपूर्ण सत्कार सोमवार दि.४ जून २०२४ रोजी करण्यात आला.

अश्विनी हरसोडेचे उत्तुंग यश व कुटूंबियांची आनंदोर्मी अन् साश्रू नयनांनी अनिर्बंध शाब्दिक उमाळा

अश्विनीच्या यशाने माझ्या मनाचा देव्हाराच लख्ख उजळला नव्हे तर सात पिढयाही दिव्य यशाच्या प्रसिद्धी प्रकाशाने न्हाऊन निघाल्या ‘ असे आनंदोद्गार अश्विनीच्या दृष्टीहिन तथा डोळस व संवेदनशील पिता समाधान हरसोडे यांनी काढले. समाधान व पत्नी उषा हरसोडे दाम्पत्य रेल्वेमध्ये खेळणी विकून व दारोदार कटलरीचे साहित्य विकून कुटुंबाचा गाडा ओढतात.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अश्विनीने नेत्रदिपक यश मिळवले असून तिला पेंटिंगची विशेष आवड आहे.गुणतालिकेत सर्वोच्च गुण मराठीत ९४ टक्के तर आवडीच्या गणित विषयात ९२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. सत्कार संयोजक विजय लुल्हे यांना अश्विनीने स्वतः रेखाटलेले निसर्गचित्रे व स्टिल लाईफ दाखविले.दीनदलितांचे दैवत डॉ.बाबासाहेब आंबेडकरायच्या ‘ शिका व संगर्ष करा ‘ या जीवन मन्तरानुसार दिनरात अभ्यास करीसनी आम्हना खान्दानन अश्विनीनं पंचकोरशीमा नाव मोठ करं ‘ हे कौतुक सांगतांना अश्विनीची आजी बेबाबाई प्रकाश हरसोडे यांना आनंदाश्रु अनावर झाले.मातोश्री उषाबाई न राहवून अभिमानाने म्हणाल्या की,’ अश्विनी अभ्यासा बरुबर सैपाक पाण्यातबी गैरी हुशार आहे .’ ‘ तुझ्या यशाचे श्रेय तू कुणाला देशील ? ‘ या प्रश्नाचे उत्तर देतांना अश्विनी लुल्हे यांना म्हणाली , ‘ प्रथमतः मला सतत प्रोत्साहन व पाठींबा देणाऱ्या वडिलांना तसेच रात्री जागून माझ्याकडून अभ्यास करून घेणाऱ्या उषा आईला तसेच मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी आणि वर्ग शिक्षक राजेंद्र बावस्कर व कलाशिक्षक अरविंद बडगुजर यांना देते.सत्काराप्रसंगी दिव्य चक्षू काका पंडित हरसोडे,ज्ञानेश्वर गुरव,लावण्या गुरव यांसह सत्कार संयोजक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे उपस्थित होते.]

सत्कारार्थी समृद्धी विष्णू वानखेडे हिने ९६ टक्के गुणांनी घवघवीत यश प्राप्त केले.ओरियन सी.बी.एस.सी इंग्लिश मीडियम स्कूलमधून समृद्धीने द्वितीय क्रमांक पटकावला एवढेच नव्हे तर सिल्व्हर पदकाची मानकरी होत गुणवत्तेचा अमिट इतिहास लिहिला ! समृद्धीला पेंटिंग या विषयात विशेष रुची आहे तसेच अवांतर वाचनाचा छंद आहे.

समृद्धीला शाल व वाचनीय ग्रंथ देऊन ज्येष्ठ साहित्यिक विजयराव रूम ( सेवानिवृत्त अभियंता, महावितरण ) यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. पिताश्री विष्णू रामचंद्र वानखेडे सेंट्रल रेल्वेत ( भुसावळ ) लोको पायलट असून मातोश्री जयश्री वानखेडे जळगाव सिव्हील हॉस्पिटल मध्ये सिनियर परिचारिका म्हणून कार्यरत आहेत.सत्कारा प्रसंगी
मातोश्री जयश्री वानखेडे,आजी रत्नाबाई गाढे,संयोजक विजय लुल्हे,वानखेडे यांचे परमस्नेही महेश शिंपी सर ( सचिव,अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती,जळगाव ) मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *