सिताराम पवार यांची राज्य परीवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्ती

सिताराम पवार यांची राज्य परीवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि.५जून,२०२४ ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक संवर्ग बदली शिपाई श्री.सिताराम पवार हे शासनाच्या नियतवयोमानानुसार २७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.प्रसंगी आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री.माधव देवधर ( नि.उप महा व्यवस्थापक,म.रा.प.म.) हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री.पृथ्वीराज ठाकूर (से.वि.नि.बुलढाणा), किशोर महाजन (वि.वा.अ.अपराध, जळगांव), इम्रान पठाण (आगार व्यवस्थापक, अमळनेर), संजय बाविस्कर (से.आ.व्य.अमळनेर), मधुकर सैदाणे ( से.आ.व्य.संगमनेर), , संदीप सूर्यवंशी (प्रादेशिक स.नाशिक प्र.इंटक यु.)नरेंद्र सिंह राजपूत (वि.स.इंटक यु.जळगांव),चंदू चौधरी (सहा.वा.अ.अमळनेर) प्रमोद बाविस्कर (सहा.का.अ.अमळनेर), अनिकेत न्ह्याळदे (वा.नि.अमळनेर), विवेक मोरे (वा.नि.धुळे), देवीदास अहिरे (से.सहा.वा.नि.अमळनेर), सतीष सातपुते (सहा.वा.नि.अमळनेर), राकेश वाघ (लेखाकार, अमळनेर), बाळासाहेब पाटील ( मा.उप सभापती,पं.स.अमळनेर),सौ.भारती अशोक पाटील ( सरपंच,ग्रा.पं.लोंढवे) होते. समारंभाच्या सुरूवातीला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पवार परिवाराकडून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.समारंभाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री.सिताराम पवार यांचा सपत्नीक स्मृती चिन्ह व शाॅल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.परिवारातुन श्री.मुकेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.माधव देवधर यांनी श्री.सिताराम पवार यांनी केलेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले व त्यांना सेवा निवृत्ती बद्दल शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचलन श्री.दीपक पवार,सर यांनी तर, आभार श्री.कुणाल पवार, सर यांनी मानले.कार्यक्रमास मा.ना.दादासो.अनिल पाटील (म.रा.मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री) सर्व श्री.डाॅ.अनिल शिंदे, शांताराम पाटील(मा.जि.प.सदस्य),एल.टी.पाटील,बन्सिलाल पाटील, मुरलीधर पवार,विजय बहिरम, देवीदास पवार, श्रीराम पाटील, अनिल जैन,लोटन पाटील, जगन्नाथ पाटील,संजय मोरे, रामचंद्र पाटील, अशोक पाटील, वाल्मिक पाटील, विजय वाडेकर, ब्रिजलाल पाटील सह रा.प.कर्मचारी वृद अमळनेर आगार, सर्व पदाधिकारी व सभासद इंटक युनियन, अमळनेर आगार, मित्र परिवार, आप्तेष्ट व लोंढवे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम स्थळी स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती.