
ईगल फाउंडेशन च्या वतीने मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे डॉ. मनिलाल शिंपी यांना राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४ प्रदान !
ठाणे:ठाणे (प्रतिनिधी)
ठाणे जिल्ह्यातील मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून होणाऱ्यासंपुर्ण महाराष्ट्रात ऊसतोड कामगार, सफाई कामगार, वीट भट्टी कामगार, दिव्यांग व अपंग परिवारांना दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तूंचे वाटप करणे, शैक्षणिक साहित्य वाटप करणे, आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बॅक पुस्तक वह्या पेन या प्रकारचे साहित्य उपलब्ध करणे, आदिवासी मोलमजूर करणाऱ्या बंधू भगिनींना साडी कपडे वाटप,ब्लँकेट वाटप करणे,असे अनेक उपक्रमांची व समाजकार्याची, शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्याच बरोबर त्यांच्याकडून नियमित होणाऱ्या अनेक सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक उपक्रमांची माहिती
तसेच त्यांना अनेक पुरस्कार,मिळाल्या बद्दल ईगल न्यूजच्या संपादिका सौ.शालन विलासराव कोळेकर, ईगल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर व त्यांच्या संपूर्ण टीमने घेतल्यामुळे, नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातील परिवर्ते येथील,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे सदस्य,तसेच आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर ठाणे,पालघर, आणि नाशिक विभागीय युनिट कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी यांना
ईगल फाउंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त रविवार दिनांक ९/६/२०२४ रोजी आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात “राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४” पुरस्कार मा.डॉ. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा तालुका- वाळवा, जिल्हा- सांगली येथे मा.आ.रामहरी रुपनवर (अप्पा), श्री.सूर्यकांत तोडकर विश्वस्त डॉ.डी.वाय.पाटील शिक्षण समुह , ऍड.श्री. चिमण डांगे सचिव ज्ञानेश्वर शिक्षण संस्था,श्री. प्रविण काकडे जेष्ठ नेते,श्री.सुभाष घुले उपायुक्त पणन, ज्ञानेश्वर सलगर महासचिव रा.स.पा, कृष्णा आलदर( FCI), श्री.अरुण घोडके ख्यातनाम वक्ते, व आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कारामुळे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे सदस्य,तसेच आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर ठाणे,पालघर, आणि नाशिक विभागीय युनिट कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी यांचे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूरचे अध्यक्ष श्री.संजयजी शेंडे, उपाध्यक्ष श्री.पी. एस. महाजन, खजिनदार श्याम फाळके, राज्य प्रशिक्षण प्रमुख दिपकजी पोहरे,ठाणे,नवी मुंबई ,नाशिक विभागीय युनिट कमांडर दिलीप स्वामी,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक जितेंद्र सोनवणे,भिवंडी पत्रकार महासंघ, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबई, चंद्रानंद कृषी पणन व समाज कल्याण संस्था गुंदवली , स्वराज्य तोरण चारिटेबल ट्रस्ट भिवंडी व स्वराज्य तोरण मित्र परिवाराकडून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येतआहेत.