नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडी (इंडिया आघाडी) चे अधिकृत उमेदवार अँड. संदिप गोपाळराव (पाटील) यांना पसंती क्र. 1 चे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा…

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक – २०२४
नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडी (इंडिया आघाडी) चे अधिकृत उमेदवार अँड. संदिप गोपाळराव (पाटील) यांना पसंती क्र. 1 चे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा…
मी अँड.संदिप गोपाळराव गुळवे(पाटील)आपणांस नम्र निवेदन करतो की,मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील सर्व शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन उमेदवारी करु इच्छीत आहे. मला राजकीय ,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कामकाजाचा चांगला अनुभव असुन मी आपल्या शाळेवर आपणास प्रत्यक्ष भेटीस येवून समक्ष संवाद साधणारच आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असुन निर्मला काॅन्व्हेंट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आहे. मी व्यवसायाने वकील असुन महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या शैक्षणिक संस्थेचा संचालक म्हणून काम पाहात आहे. माझे वडील कै. लोकनेते गोपाळराव गुळवे (पाटील) हे नाशिक जिल्हा कॉग्रेसचे १५ वर्ष अध्यक्ष होते. तसेच त्यांनी आपल्या विभागातील जळगांंव जिल्हा कॉंग्रेसचे देखील काम केलेले आहे.ते नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग ४५ वर्ष संचालक तसेच काही काळ बॉंकेत पदाधिकारी म्हणून सेवारत होते. तोच सेवाभावी कामांचा वारसा जपत त्यांच्या नंतर मी सुद्धा जिल्हा बॉंकेचे संचालक म्हणून यशस्वी कामकाज केलेले आहे. समाजहिताची तळमळ व विविध सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण असल्यामुळे गुळवेदादा नाशिक जिल्हा परिषदेचे ५ वर्ष अध्यक्ष व १० वर्ष सदस्य म्हणून यशस्वी योगदान देऊ शकले. तसेच माझ्या मातोश्री कै.इंदूमती गोपाळराव गुळवे (पाटील)यांनी सुध्दा नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून यशस्वी कामकाज केलेले आहे. त्यामुळे मला ही ५ वर्ष जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावता आले.कै.दादा साहेब गुळवे (पाटील)यांनी सन १९७८ मध्ये महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ ,नाशिक या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात अनेक दर्जेदार शैक्षणिक उपक्रम सुरू केलेले आहेत. यख शैक्षणिक संस्थेच्या३प्राथमिक शाळा ,२२माध्यमिक शाळा,६ज्युनिअर कॉलेज,१बी एड.कॉलेज,१पॉलिटेक्निक कॉलेज,१आय .टी.आय.अशा विद्याशाखा असुन त्याद्वारे दर्जेदार शैक्षणिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत. या शैक्षणिक संस्थेत सन १९९६ पासून मी पदाधिकारी म्हणून कामकाज केलेले आहे. तसेच मी नाशिक म.न.पा.शिक्षण मंडळावर १० वर्ष सदस्य म्हणून कामकाज करत असतांना अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्याचे काम केलेले आहे. मला शैक्षणिक संस्था व शिक्षकांच्या अनेक समस्यांची जाणीव आहे. शासनाने शैक्षणिक क्षेत्रात अनेक अन्यायकारक निर्णय घेतलेले आहे. याची मला संपूर्ण जाणीव आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिक व ज्ञानपरायण वृत्तीने काम करणा-या कर्मचाऱ्यांच्या विरोधात व संस्थेच्या विरोधात शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल लढा देऊन आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपली समर्थ साथ मला हवी आहे आपल्या हक्काचा माणूस म्हणून मला या मतदार संघात पसंती क्रमांक १चे मतदान देवून निवडून द्यावे व आपल्या सेवेची संधी द्यावी ,ही नम्र विनंती.
आपला स्नेहाकिंत
अँड संदीप गोपाळराव गुळवे(पाटील)
संचालक-मराठा विदया प्रसारक समाज नाशिक