धक्कादायक !पत्नीच्या कृत्याने धरणगाव हादरलं, अपंग पतीला शेतात नेलं अन्…

धक्कादायक !
पत्नीच्या कृत्याने धरणगाव हादरलं, अपंग पतीला शेतात नेलं अन्…
धरणगाव प्रतिनिधी –
धरणगाव : अपंग पतीला विहिरीत ढकलून पत्नीनेच खून केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकणी पत्नीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सुर्यवंशी हा तरुण आपल्या पत्नीसह वास्तव्याला होता. २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान, संशयित आरोपी पत्नी पती प्रकाश सुर्यवंशी याला सोबत घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात गेली. नंतर पतीचा अपंगत्वाचा फायदा घेत त्याला विहिरीत ढकलले. यात पती प्रकाश सुर्यवंशी याचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार बुधवार १२ जून रोजी रात्री नऊ वाजता समोर आला. दरम्यान, या खुनाची कबुली स्वतः पत्नीने दिली. त्यानुसार धरणगाव पोलिसात संशयित आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास धरणगाव पो.स्टे.पोनि.उद्धव ढमाले हे करीत आहेत.