साने गुरुजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव व नवागतांचे स्वागत

साने गुरुजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव व नवागतांचे स्वागत
अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एसएससी मार्च 2024 परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव करण्यात आला. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत इयत्ता आठवीची पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव दादासो संदीप घोरपडे होते. यावेळी मुख्याध्यापक श्री सुनिल पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे, सहसचिव ॲडव्होकेट अशोक बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक श्री गुणवंतराव पाटील, श्री भास्करराव बोरसे ,श्री किरण पाटील शिक्षण तज्ञ श्री गोकुळ बोरसे ,श्री हिम्मतराव पाटील इंजिनीयर श्री विजय बाविस्कर ,शिक्षक प्रतिनिधी श्री विलास चौधरी उपस्थित होते
विद्यार्थी मनोगत नयन पाटील…….. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनीष उघडे व जे एस पाटील तर आभार प्रदर्शन श्री डी ए धनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.