• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप,गुजर नाभिक समाजाचे समाज संघटन कौतुकास्पद- मकरंद पाटील

Jun 19, 2024

Loading

शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे
शैक्षणिक साहित्य वाटप,गुजर नाभिक समाजाचे समजसंघटन कौतुकास्पद आहे: मकरंद पाटील

राष्ट्रसंत संतसेना महाराजांचा वारसा खऱ्या अर्थाने गुजर नाभिक समाज जोपासत आहे.:डॉ. मनिलाल शिंपी

नंदुरबार:शहादा- (प्रतिनिधी) श्री. संतसेना नाभिक शिक्षण समिती च्या विद्यमाने शैक्षणिक साहित्य व शिष्यवृती वितरण आणि सेवा पूर्ती समारंभ दि :- १७/०६/२०२४ रोजी दुपारी श्री संत सेना समाज भुवन रामदेव बाबा नगर शहादा येथे संपन्न झाला कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे अध्यक्ष उद्धव जांभळे व शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन माननीय मकरंद पाटील , मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख आर एस पी अधिकारी युनिट कमांडर कमांडर डॉ. मनिलाल शिंपी, शहादा तालुक्यातील प्रसिद्ध आरोग्य सेवक डॉक्टर किशोर आमोदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सेना महाराज प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नाभिक समाजातील मातृ छात्र व पितृ छत्र हरपलेल्या मूला मुलींना श्री संत सेना शिष्यवृती चे वितरण शहादा व तळोदा मतदार संघातील लोक प्रिय आमदार राजेश पाडवी व शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मकरंद पाटील यांचा शुभहस्ते करण्यात आले.नंदुरबार जिल्ह्यात गुजर नाभिक समाजाचे कार्य, व समाज संघटन कौशल्य खूप कौकस्पद आहे.असे शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मकरंद भाई पाटील यांनी नाभिक समाजाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख मनिलाल शिंपी यांनी समाजाच्या विविध उपक्रम व कार्यपद्धती विषयी बोलताना सांगितले की, गुजर नाभिक समाजामध्ये न्यायदानात समाज न्याय मंडळ व पंचायत यांचे कार्य खरोखर स्तुत्य आहे, गुजर नाभिक समाजाचे कोणतेही भांडण कोर्टात दाखल करण्यात येत नाही, शिस्तबद्धता, शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात कापसामध्ये सगळे तंटे सोडवले जातात. नाभिक समाजाच्या न्यायदानाच्या हा आदर्श सर्वांनी घ्यावा हे सांगितलं. परिवर्धे येथील गोरगरिबांचे कैवारी डॉक्टर किशोर आमोदकर यांनीही समाजाच्या विविध उपक्रमाबाबत कौतुक केले व अशा उपक्रमांसाठी माझी कायमस्वरूपी मदत राहील असेही यावेळी त्यांनी आश्वासन दिले. यानंतर समाजातील गरीब,हुशार,गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य चे वितरण डॉ. किशोर आमोदकर,डॉ. स्वप्निल महाजन , भास्कर देवरे , प्रा रवींद्र जाधव, छोटूलाल जाधव या मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.
समाजातील मातृछत्र व पितृछत्र हरपलेल्या एका भाग्य विजेता मुलास व एका भाग्य विजेत्त्या मुलीस साइकल चे वितरण मकरंद पाटील , विनोद जैन , डॉ. मणिलाल शिंपी या मान्यवरांचा शुभहस्ते करण्यात आले,
समाजातील शासकीय व निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेले समाजबांधव श्री सतीश नांदेडकर,श्री प्रभाकर सोलंकी,व श्री अंबालाल सोनवणे यांच्या सत्कार व सन्मान धर्मेश कुवर , मकरंद पाटील व भास्कर देवरे या मान्य वरांचा शुभ हस्ते करण्यात आला,या कार्यक्रमात संदीप रघुवंशी , संजय जांभळे , मा.अंबालाल पवार , मा.ज्ञानेश्वर जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत.
या कार्यक्रमात समाजाचे आजी- माजी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य , विभागीय अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य , विविध संस्थेचे व मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व संचालक वर्ग अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते समाज बंधू भगिनी,पालक वर्ग व विद्यार्थी – विद्यार्थींनी मोठ्या संखेने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा.सुभाषजी सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण समितीचे सचिव अशोक जाधव , उपाध्यक्षा सौ. सुचिता पवार व संचालिका सौ.उज्वला जांभळे यांनी केले शिक्षण समितीचे सचिव श्री.अशोकजी जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप राष्ट्र गीताने करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री अजितेम सोनवणे , कोशाध्यक्ष श्री हरीशजी सोलंकी , सहसचिव श्री रमनजी सोनवणे , संचालक प्रा डॉ उद्धवजी जाधव , परीवर्धे येथील समाजसेवक किशोर जाधव, प्रदीप जाधव,सुदाम मदन जाधव , भिलुभाई रतिलाल जांभळे , रवींद्र विठ्ठल सूर्यवंशी , भरत देविदास पवार , सुनील बन्सीलाल सूर्यवंशी , किरण मोहन साळुंखे , ज्ञानेश्वर काशिनाथ सोलंकी , अमृत नारायण सोनवणे , जयेश रवींद्र सोनवणे , सौ उज्वला संजय जांभळे , रवींद्र दगडू जाधव , विजय हरीश परमाळकर , पुरुषोत्तम जगन्नाथ कन्हैया , दिनेश काशीनाथ जाधव , महेश तुंबा सोलंकी , रविंद्र सखाराम होळकर , योगेश एकनाथ सोनवणे , मयुर अजय बोरदेकर , प्रशांत किशोर होळकर , अनिता मनोहर जाधव , आरती भूषण नांदेडकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *