
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
जागतिक योगा दिवस साजरा
अमळनेर प्रतिनिधी-
21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्याचे कारणही अत्यंत मोठे आहे. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. यामुळेच या दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून करण्यात आली.देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला.
दरवर्षी २१ जून रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. या दिवसाचे खास महत्त्व आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजर केला जातो.असे स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी,एस.के.महाजन यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध प्रकाराचे प्रात्यक्षिक करून माहिती दिली.
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले की भारतीय धर्म संस्कृतीमधील “योग” संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते.
यावेळी शाळेचे शिक्षक आय आर महाजन, एस के महाजन ,अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, गुरुदास पाटील उपस्थित होते.. यावेळी इयत्ता आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते..