• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !….

Jun 21, 2024

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !….

योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक )

नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक )

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल व नूतन प्राथमिक विद्यामंदिर धरणगाव येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. नियमित योगासने व प्राणायाम केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते हा मूलमंत्र पवार यांनी दिला.
सर्वप्रथम योग दिनाची सामुहिक प्रार्थना घेण्यात आली. यानंतर शाळेतील योगशिक्षक एच डी माळी यांनी विद्यार्थ्यांना योगासने व प्राणायामाचे विविध प्रकार प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रात्यक्षिक करत असतांना शाळेतील क्रीडा शिक्षक एस एन कोळी यांनी विविध प्राणायाम व योगासने यांचे फायदे व तोटे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत योगासने व प्राणायाम करण्याचा आनंद घेतला व त्याचे फायदे समजून घेतले. समारोपप्रसंगी सामूहिक शांतिमंत्राचे पठण केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी तसेच शाळेतील शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी देखील योगासने व प्राणायाम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *