

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर शाळेत योगदिन उत्साहात संपन्न
ठाणे/कल्याण( मनिलालशिंपी).
आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग विद्याधाम डोंबिवलीच्या सौ.राधिका केतकर व त्यांचे सहकारी सौ.सुनीता रत्नाकर, मनिषा फाटक व अपूर्वा चिपळूणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. इयत्ता पाचवी ते सातवीच्या प्रत्येक वर्गातील दहा-दहा विद्यार्थी असे निवडक विद्यार्थी निवडून, प्रथम दोन दिवस स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेची माजी विद्यार्थीनी कु. पूर्वा मुसळे हीच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस विद्यार्थ्यांची वेगवेगळी आसने व प्राणायाम सराव घेण्यात आला.आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशी आसने व प्राणायाम करून विविध प्रात्यक्षिके केली. विद्यार्थ्यांसोबतच सहकारी शिक्षक व शिक्षिकाही ही योग विद्या अभ्यासात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ.राधिका केतकर यांनी ,अगदी कमी वेळात सराव करून चांगले प्रात्यक्षिक केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
ज्याप्रमाणे आपण विषयांचा अभ्यास करतो त्याच्यातून आपण विद्या मिळवतो. अगदी त्याचप्रमाणे योग विद्या अभ्यास करणे देखील महत्त्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले. शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना योगा ला जातो असे न म्हणता योग विद्या अभ्यासासाठी मी जात आहे असे म्हणावे. कौटिल्यसन व कमलासन या कठीण आसनाची त्यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली.वयाच्या 63 व्या वर्षी देखील आपण सर्वांग सुंदर योग करू शकतो ह्याची जाणीव सर्वांना राधिका केतकर यांचे योग प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर झाली.
इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी व इतर वर्गातल्या विद्यार्थ्यांनी वर्गातच ध्यानधारणा व प्राणायाम केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना लाइव प्रोजेक्टर द्वारे विविध योग आसने दाखवण्यात आले व करून घेण्यात आली. सदर कार्यक्रमाला शाळा समिती सदस्य दांडेकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अहिरे सर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ . प्रेरणा पाटील यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ.भावना राठोड यांचे मार्गदर्शन लाभले .