शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मला हिंमत देणाऱ्या सर्व शिक्षक मतदार बंधू आणि भगिनीचे आभार!!!
सचिन रमेश झगडे-उमेदवार नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ
व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत जिंकणे किंवा हारणे महत्वाचे नसते तर प्रथमतः त्या लढाईत उतरणे महत्वाचे असते. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आपणा सर्वांच्या प्रेरणेने मी या लढाईत उतरलो आणि अगदी अल्प कालावधीच्या प्रचारात आपण मला आज मतदानाच्या रूपाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिक्षण व्यवस्था धनदांडग्या लांडग्यांच्या हातात जाऊ न देण्यासाठी आजही शिव, फुले ,वशाहू ,आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि कर्मवीर अण्णाच्या शैक्षणिक विचारांचा वारसा हृदयात जपणारे शिक्षक बांधव आणि भगिनी आहेत याची प्रचिती मला मतदारसंघात प्रचाराच्या निमित्तानं शिक्षकांशी हितगुज करतांना आली.
आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या या प्रेरणेने मला कायम आपले प्रश्न घेऊन लढण्यासाठी सज्ज केले आहे.आपण माझ्यात निर्माण केलेली ऊर्जा मला पुढील शिक्षक बांधवांच्या राजकीय, सामजिक,संघटनात्मक आघाड्यावर लढण्यासाठी बळ देईल.आणि आपल्या भविष्यातील विजयाचा मार्ग सुकर करेल यात किंचितही मनात संदेह नाही.
आपण माझ्यासारख्या सामान्य शिक्षकावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!!
*आपला सेवक*
*सचिन रमेश झगडे*
*उमेदवार नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ*
8275515232