• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रबोधनाची चळवळ महापुरुष्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणारे युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर चे महाअभियान

Jun 28, 2024

Loading

प्रबोधनाची चळवळ महापुरुष्यांच्या जयंतीनिमित्त
विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणारे युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर चे महाअभियान

अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रीय महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत व समाजात सकारात्मक प्रबोधन व्हावे यासाठी युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी एकाच दिवशी १०४ ठिकाणी राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली असे प्रा अशोक पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले. हा महत्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील एकमेव अभिनव प्रयोग आहे अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध विचारवंत व लेखक जयसिंग वाघ यांनी दिली.
*अभियानाची वैशिष्ट्ये*

● *वक्त्यांची कार्यशाळा*:राजर्षी शाहु महाराज जयंतीच्या आधी २३ जुन २०२४ रोजी धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ संदीप नेरकर व प्रा डॉ लीलाधर पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. यावेळी सोपान भवरे सर यांनी राजर्षी शाहु महाराजांच्या कर्तृत्वावर आधारित अभ्यासपुर्ण तयार केलेले वाचन साहित्य सर्व वक्त्यांना देण्यात आले.
● २६,२७ जुन २०२४ रोजी झालेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त १०४ कार्यक्रम सहा तालुक्यात संपन्न झाले. त्यात अमळनेर तालुक्यातील ६५ माध्यमिक शाळा व १३ जि प प्राथमिक शाळा, पारोळा तालुक्यातील १५ माध्यमिक शाळा, धरणगाव तालुक्यातील ७ माध्यमिक शाळा, एरंडोल २,चोपडा १,धुळे १ अश्या प्रकारे समावेश आहे.
● *स्वयं प्रेरणेने काम करणारे वक्ते*
राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान सर्वांसाठी खुले असून महाविद्यालयाचे प्राध्यापक, माध्यमिक शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, सेवा निवृत्त शिक्षक,अधिकारी, केंद्र प्रमुख, प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी वक्ते यांचा समावेश आहे.१०४ वक्त्यांपैकी कुणीही मानधन वा प्रवासखर्च घेत नाहीत.सर्व वक्त्यांची भाषणे उत्कृष्ट झालीत. या उपक्रमात माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
राजर्षी शाहु महाराज जयंती महोत्सव प्रमुख डी ए पाटील यांना प्रा डॉ राहुल निकम,अशोक बिऱ्हाडे, बापूराव ठाकरे,संजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व वरिष्ठ वक्त्यांचा सहभाग होता.
प्रा भगतसिंग परदेशी या वक्त्याने सी आर पाटील इंग्लिश मीडियम स्कूल,तांबेपुरा या शाळेतील मुलांना खाऊचेही वाटप त्यांचे तर्फे करण्यात आले.
याचप्रमाणे बापूराव ठाकरे सर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्य विद्यालय, पैलाड येथे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ सह चॉकलेट आणि पेन च वाटप स्वखर्चातून केलं.
● *२५ हजार विद्यार्थ्यांना लाभ*
दिनांक २६,२७ जून २०२४ राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्त१०४ कार्यक्रमातून वक्त्यांनी सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत शाहु महाराजांचे व्यक्तिमत्त्व व कर्तृत्व पोहचविले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी वक्त्यांनाही भाषण करण्याची संधी मिळाली.
● *कोणतेही अनुदान नाही*
राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत कार्यक्रमासाठी समाजातून निधी अथवा देणग्या गोळा केल्या जात नाही. सदर उपक्रम कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत येत नाही, त्यामुळे कोणतेही अनुदान मिळत नाही. जो खर्च करावा लागतो तो युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार हे स्वतः करतात.
● *राजर्षी शाहु महाराज विशेषांक*
साप्ताहिक लेखन मंच चे कार्यकारी संपादक अजय भामरे यांनी राजर्षी शाहू महाराज विशेषांकाचे प्रकाशन २६ जून रोजी प्रबुद्ध विहार,अमळनेर येथे केले. यावेळी अभियानाचे सर्व वक्ते उपस्थित होते. युवा कल्याण प्रतिष्ठानने विशेषांकाचे निःशुक्ल वाटप केले.
राष्ट्रीय महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करून प्रबोधन करणाऱ्या राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *