• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण

Jul 8, 2024

Loading

मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दाणादाण उडालेली आहे मुंबई महानगरपालिकेने मदत कक्ष निर्माण केला आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी सकल भागात पाणी साचले येथील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे. महापालिका कक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली असली तरी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी आणि बंद झालेल्या रेल्वे यामुळे मुंबईकरा चाकरमान्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. मुंबईकरानी सावधगिरी बाळगावी असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *