
मेघ दाटुनी येता… चिंब पावसाच्या कविता कार्यक्रम उत्साहात संपन्न.
मेघ दाटुनी येता… चिंब पावसाच्या कविता कार्यक्रम उत्साहात संपन्न.
जळगाव प्रतिनिधी(प्रा.अतुल इंगळे):
जळगांव येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित कान्ह ललित कला केंद्र व स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.११रोजी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉलमध्ये मेघ दाटूनी येता चिंब…. पावसाचा कविता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठीतील सुप्रसिद्ध कवींच्या पावसाधारित कवितांचे गायन व अभिवाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.शशिकांत वडोदकर यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे लेखन व निवेदन प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी तर काव्य अभिवाचन डॉ.श्रद्धा पाटील व गायन प्रा.इशा वडोदकर यांनी केले. सदर कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी यांची पेरणी ,बा.सी. मर्ढेकर यांची कितीतरी दिवसात, बा.भ. बोरकर सरीवर सरी आल्या ग, ना.धों.महानोर (मन चिंब पावसाळी), रविचंद्र हडसनकर (सरावन महिना आला की), बालकवी (फुलराणी,श्रावण मासी),शांता शेळके (आला पाऊस मातीच्या वासात ग),इंदिरा संत( नको नको रे पावसा) सौमित्र इत्यादी कवींच्या कवितांचे काव्यवाचन व गायन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रसाद देसाई, प्रा.संदीप वानखेडे प्रा.प्रवीण महाजन प्रा.संदीप गव्हाळे,विजय जावळे यांनी परिश्रम घेतले. शहरातील काव्यरसिक तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.*