
जळगावचा अभिमान! IAS राजेश पाटील यांची ओरिसा सचिवपदी नेमणूक
जळगावचा अभिमान! IAS राजेश पाटील यांची ओरिसा सचिवपदी नेमणूक
जळगाव प्रतिनिधी- एरंडोल तालुक्यातील ताडे गावाचे सुपुत्र आय ए एस अधिकारी राजेश प्रभाकर पाटील यांची नुकतीच ओरिसा राज्याच्या सहकार विभागाच्या सचिव पदी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी ओरिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली. यासोबतच त्यांची विशेष सचिव गृहनिर्माण व नगर विकास विभागात सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ओडीसा स्टेट हाऊसिंग कार्पोरेशनच्या अध्यक्षपदी ही अध्यक्षपदाचाही पदभार त्यांना सोपवण्यात आलेला आहे .
राजेश पाटील यांनी याआधी मयूरभंज कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार तसेच पंतप्रधान पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे .त्यांच्या कारकिर्दीत कोरापुट हा देशातील पहिला शाळाबाह्य मुलांचा जिल्हा बनला तसेच त्यांनी महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त म्हणून पार पाडलेली कारकीर्द ही नागरिकांच्या मनात घर करून गेली.
नुकतेच पार पडलेल्या देशातील स्वच्छ सर्वेक्षण अहवालानुसार भुवनेश्वर महानगरपालिका देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. राजेश पाटील यांच्या कामाचा आवाका बघून ओरिसा सरकारने त्यांच्यावर विशेष जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. जया नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.