
25 जुलै 2025 रोजीचे जिल्हा परिषदेसमोरील आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन यशस्वी….
25 जुलै 2025 रोजीचे जिल्हा परिषदेसमोरील आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन यशस्वी….
अमळनेर प्रतिनिधी
राज्यसह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन लागू करण्यात यावी.
गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना कंत्राटी सेवेचे लाभ लागू करण्यात यावे.
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचा थकीत मोबदला तातडीने देऊन तो दरमहा अदा करण्यात यावा.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना विमा दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे.
आशा स्वयंसेविकांना JSY तसेच आरोग्यवर्धिनीच्या कामाचा मोबदला आणि गट प्रवर्तकांना आरोग्यवर्धिनीच्या कामाचा लाभ लागू करण्यात यावा.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.
आशा सेविका व गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षाऐवजी 65 वर्षे करण्यात यावे.
श्रीमती मिना दिनेश पाटील आशा सेविका यांना सेवेत पुनःछ सामावून घ्यावे.
यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगांव जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 25 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
थकीत मोबदला तीन ते चार दिवसांपूर्वीच आशा व गटप्रवर्तकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
वरील मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्वीकारले. निवेदन देतेवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, आशा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रविण जगताप उपस्थित होते.
शासन स्तरावरील मागण्याचे निवेदन शिफारशीसह शासनाला पाठवावे असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सीईओ नी दिले.
धरणे आंदोलनातं मोठया संख्येने आशा सेविका व गट प्रवर्तकांनी भागीदारी केली धरणे आंदोलन यशस्वी झाल्याचे रामकृष्ण बी. पाटील यांनी सांगितले.
धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कल्पना भोई,भागीरथी पाटील,सुनंदा पाटील,रविशा मोरे,अनिता पाटील,भारती नेमाडे,सुनीता भोसले,सुनंदा हडपे,नम्रता पाटील,भारती तायडे,अनिता कोल्हे,उषा पाटील,उषा मोरे,भारती चौधरी,ज्योती कोळी आदी गट प्रवर्तक आणि आशा सेविकांनी प्रयत्न केले आहे.