
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पारोळा पोलीस स्टेशन गुरक्रं. १९९/२०२५ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे दिंनाक २४/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक जिंतेद्र वल्टे, पोहवा संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोकॉ राहुल कोळी यांचे तपास पथक तयार करुन, नमुद गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशीत केले होते त्याअनुशंगाने तपासपथकातील अधिकारी / कर्मचारी यांनी घटनास्थळाचे तसचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, सदरचा गुन्हा हा संशयीत इसम नामे भुषण कैलास चंदनशिव वय २७ वर्ष रा. अमळनेर याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास गोपनीय सुत्रधार यांच्याकडुन माहीती काढुन त्यास ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता, सदरचा गुन्हा हा त्यानेच केला असल्याची कबुली दिली आहे. त्यास पारोळा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर सो. अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग, तसेच मा.श्री. विनायक कोते उपविभागीय पोलीस अधिकारी सो. अमळनेर उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, PSI जिंतेद्र वल्टे नेम. स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, पोहवा संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पो.कॉ राहुल कोळी यांच्या पथकाने केली आहे.